Wednesday 30 December 2020

शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तीनशे अठ्याऐंशी अर्ज, कल्याण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी?

शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तीनशे अठ्याऐंशी अर्ज, कल्याण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी?


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या आजच्या शेवटच्या दिवशी तब्बल ३८८ अर्ज दाखल झाले असून यामुळे २११ सदस्य पदाकरिता एकूण ७२८ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता तालुक्यात ख-या अर्थाने निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे.
कल्याण तालुक्यातील आणे भिसोळ, गोवेली रेवती, बापसई नवगाव, रायते पिंपळोली, घोटसई म्हारळ वरप कांबा, निंबवली मोस, गुरवली, राया ओझर्ली, जांभूळ वसत आपटी मांजर्ली, म्हसकळ अनखर, मानवली, बेहरे उतणे चिंचवली, खोणी वडवली, वडवली शिरडोण, सांगोडा कोंढेरी, आणि नडगाव दांणबाव अशा २१ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या. एकूणच ७४ प्रभागातील २११ सदस्य पदाकरिता सुमारे ३१ हजार २४७ पुरुष व २७ हजार १३७ स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे २३ डिसेंबर २०२० ला एकही अर्ज सादर झाला नाही. दुसऱ्या दिवशी १२, तिसऱ्या दिवशी ७२ तर काल २५६ असे तब्बल ३४० उमेदवारी अर्ज भरले होते आज उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आहे. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी सुमारे ३८८ अर्ज दाखल झाले आहेत, त्यामुळे एकूण उमेदवार ७२८ झाले आहेत. 
त्यामुळे एकूणच तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मातब्बर उमेदवार निवडून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता खरी निवडणूकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण कोणाची जिरवण्यासाठी निवडणूक मैदानात राहतो? कोण खरेदी विक्री व्यवहारात सहभागी होतो तर कोण गाव विकासासाठी निवडणूक लढतो हे कळणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या ४ जानेवारी २०२१ ची वाट पहावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...