Wednesday 30 December 2020

वीर गावचे सुपुत्र महेश दुर्गोळी यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन !

वीर गावचे सुपुत्र महेश दुर्गोळी यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन !

"एक प्रेमळ शिक्षक कर्मचारी,वीर गावचे माजी उपसरपंच ते कुणबी विकास मंडळ,वहाळ विभाग ( ग्रामीण ) सचिव अशी अनेक पद भूषवणारे सर्वसामान्यांचे नेतृत्व हरपलं"- दिपक कारकर


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

      चिपळूण तालुक्यातील अंतिम टोकाच्या "वीर" या खेडेगावात जन्मलेले महेश रत्नाकर दुर्गोळी यांची आज प्राणज्योत मावळली.आपल्या कौटुंबिक परिस्थितीचा संघर्ष करत उच्च शिक्षण घेऊन अगदी शिक्षक ते सामाजिक कार्यात अग्रनिय असणाऱ्या महेश यांना आज बुधवार दि.३० डिसेंबर २०२० पहाटे ०६:०० वा. सुमारास ह्रदय विकाराचा आलेला झटका आणि त्यांचा घडून आलेला क्षणीच मृत्यू या बातमीने पंचक्रोशी सुन्न झाली आहे.

               डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय (मांडकी -पालवण) येथे सहाय्यक प्राध्यापक महेश दुर्गोळी (वय- ३४) कार्यरत होते. एक अत्यंत हुशार, प्रेमळ स्वाभाविक शिक्षक तितकंच गावचा विकास आणि सामाजिक योगदात सक्रिय असणाऱ्या महेश यांनी दिलेलं योगदान अविस्मरणीय आहे. एक शिक्षक म्हणून कार्यरत असताना अगदी वीर-देवपाट गावची ग्रामपंचायत उपसरपंच पदी कार्यभार सांभाळला, कुणबी विकास मंडळ, वहाळ विभाग (ग्रामीण) चे सचिव, वीर ग्रामस्थ मंडळाचे सदस्य अशा अनेक पदावर प्रामाणिकपणे काम करून युवकांच्या ह्रदयात वसलेलं हे व्यक्तिमत्त्व अचानक सोडून गेल्याने समाजाची खूप मोठी हानी झाली आहे.

              पंचक्रोशीतील एक मन मिळावू व्यक्तिमत्त्व, विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करणारे युवकांचे आशास्थान /मार्गदर्शक शिक्षक महेश दुर्गोळी यांच्या आठवणी आज वीर गाव किंवा वहाळ पंचक्रोशीतील प्रत्येकाच्या ह्रदयी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे.त्यांना कुणबी विकास मंडळ, वहाळ विभाग (ग्रामीण - मुंबई) / वीर ग्रामस्थ मंडळ या सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...