Wednesday 30 December 2020

मालती स्मृती ट्रस्ट ठाणे व पाणी पुरवठा अध्यक्ष यांच्या सहकार्यामुळे खोपिवली शाळेला मिळाले ''पाणी'' !

मालती स्मृती ट्रस्ट ठाणे व पाणी पुरवठा अध्यक्ष यांच्या सहकार्यामुळे खोपिवली शाळेला मिळाले ''पाणी'' !


मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यातील खोपिवली हे गाव गेल्या अनेक दशकांपासून पाणी टंचाई ग्रस्त गाव म्हणून ठाणे जिल्ह्यात ओळखले जात होते. मात्र बारा वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे ग्रामीण नळपाणी पुरवठा कमिटीचे अध्यक्ष श्री मंगल डोंगरे यांच्या जिद्दी स्वभावामुळे व प्रयत्नांमुळे अनेक अडचणींवर मात करत अखेर या गावाची पाणी टंचाई दुर करण्यात यश आले. 


आणि गावातील महिला मंडळींची होणारी पायपीट, रात्रभराच्या जागरण, नाईलाजाने विकत पाणी घेऊन भागवावी लागणारी तहान या सर्व गोष्टींवर मात करण्यात श्री मंगल डोंगरे याना यश आले खरे. पण गावातील शाळेला पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आणि जि. प. प्राथमिक शाळा गावापासून दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांची खूपच गैरसोय होत होती. हि गैरसोय दूर व्हावी म्हणून नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकुंद कराळे हे सतत धडपडत होते. शालेय विद्यार्थ्यांना पाणी मिळावे म्हणून अर्ज, विनंत्या व मदतीची आर्जव करत होते. मात्र सदरची समस्या सुटावी म्हणून त्यांनी ग्रामीण नळपाणी पुरवठा खोपिवलीचे अध्यक्ष मंगल डोंगरे यांच्याकडे विनंती केली असता त्यांनी कोणत्याही विरोधाला न जुमानता आपल्या अधिकारा खाली लेखी परवानगी देऊन सदरची समस्या सुटण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. परंतु त्यानंतर ही मुख्य पाईपलाईन पासून शाळेपर्यंत पाणी जाण्यासाठी १५०० मीटर पाईप व पाण्याची साठवण करणारी टाकी अश्या दोन गोष्टींची नितांत गरज होती. अश्यावेळी ठाणे येथील मालती स्मृतीं ट्रस्ट यांच्याशी संपर्क साधून सदरची समस्या सोडविण्यासाठी विनंती केली असता ट्रस्टचे संचालक धनंजय गणेश महाजन यांनी तात्काळ  मदतीचा हात पुढे करून १५०० मीटर पाईपलाईन व साठवण टाकी उपलब्ध करून दिंल्याने व या शाळेचे शिक्षक दिपक भोईर सर यांनी पाईप लाईन टाकण्यासाठी गावातील पालकांना बोलावले असता कोणीही पालक आले नाही. असे असताना स्वतः पदरमोड करून 9000/- रुपये खर्च केले. आणि आज जि प प्राथमिक शाळा खोपिवलीची पाण्याची समस्या सुटल्याचे समाधान शाळेचे शिक्षक, विध्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकुंद कराळे यांच्या चेहऱ्यावर दिसून आले.  

"काही करण्याची जिद्द ज्यांच्या कडे असते त्यांच्या अवघड समस्याही दूर होतात". त्याचे हे ज्वलंत उदाहरण असल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...