Wednesday, 30 December 2020

टिळक नगर, डोंबिवली येथील पोलिसांची कारवाई सीसीटीव्हीच्या आधारे सोनसाखळी चोरट्यांना बेड्या अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत !

टिळक नगर, डोंबिवली येथील पोलिसांची कारवाई सीसीटीव्हीच्या आधारे सोनसाखळी चोरट्यांना बेड्या
अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत !


कल्याण, प्रतिनिधी : रस्त्याने जाणाऱ्या एकट्या दुकट्या नागरिकांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. 


डोंबिवली पूर्वेकडील ज्योतीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या या चोरट्याकडून आतापर्यत चार गुन्ह्याची उकल करत त्यातील अडीच लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. विशाल वाघ, शंकर उर्फ शंखू जाधव , गजानन उर्फ भोला घाडी  अशी आरोपीची नावे आहेत.
काही दिवसापूर्वी सकाळी 6 वाजता कचरा टाकण्यासाठी जाणाऱ्या वृद्ध  महिलेच्या गळ्यातील चेन चोरट्यांनी खेचुन तिला ढकलून दिल्याची घटना घडली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या घटनेच्या तपासा दरम्यान टिळकनगर पोलिसांनी ज्योतीनगर झोपडपट्टीतून आरोपीना अटक केली आहे. तपासात या आरोपींनी गुन्ह्याची कबुली देतानाच टिळकनगर हद्दीत आणखी 2 तर मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच महात्मा फुले पोलीस हद्दीत प्रत्येकी 1 गुन्हा केल्याची कबुली दिली. 

अशी माहिती विवेक पानसरे (पोलीस उपायुक्त परिमंडळ 3) यांनी दिली.

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...