Thursday 24 December 2020

कल्याण तालुक्यातील सव्वीस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुसर्‍या दिवशी बारा उमेदवारी अर्ज दाखल !

कल्याण तालुक्यातील सव्वीस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुसर्‍या दिवशी बारा उमेदवारी अर्ज दाखल !


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य पदाकरिता जाहीर झालेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसला तरी दुसर्‍या दिवशी मात्र तब्बल १२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे बिनविरोध ग्रामपंचायत करण्याच्या प्रयत्नाला सुंरग लागतो की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.
कल्याण तालुक्यातील ४६ पैकी २६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये मानिवली, रायते पिंपळोली, घोटसई म्हारळ वरप कांबा पावशेपाडा, गोवेली, निंबवली मोस, गुरवली, उतणे चिंचवली, राया ओझर्ली, म्हसकळ, आपटी मांजर्ली, जांभूळ, नडगाव दांणबाव, खोणी वडवली, सांगोडा कोंढेरी, नागाव, दहिसर, वाकळण आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यातील कल्याण ग्रामीण भागातील म्हणजे २१ ग्रामपंचायती बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. अनेक आमदारांनी आप आपल्या मतदारसंघात ग्रामपंचायती बिनविरोध करा व निधी मिळवा अशी आँफर दिली आहे.
कारण निवडणूक म्हटले की वाद विवाद, भांडणे, हाणामारी पोलीस केसेस आल्याच, यामुळे गावातील वातावरण अशांत बनते, हे टाळण्यासाठी बिनविरोध निवड हे गावाच्या विकासासाठी महत्त्वाचे असते. तसे प्रयत्न सुध्दा सुरु होते. २३डिंसेबर हा उमेदवारी अर्ज सादर करण्याचा पहिला दिवस होता. या दिवशी तालुक्यातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होते की काय असे वाटत होते. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे आज तब्बल १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये म्हारळ १,कांबा १,मानिवली२, म्हसकळ अनखर १,नडगाव दांणबाव १,आणि राया ओझर्ली ६असे १२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे अजून किती उमेदवार अर्ज भरतात हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच, जस जसे निवडणूक जवळ येईल तस तसे निवडणूकीची रणधुमाळी पहायला मिळेल. पण मतदारांनी मात्र सदसद्विवेकबुद्धीने मतदान करायला हवे!

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...