Wednesday 23 December 2020

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली म्हसा यात्रा रद्द !!

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली म्हसा यात्रा रद्द !!


**कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने घेतला निर्णय **

मुरबाड (मंगल डोंगरे) : संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील जनतेला हवीहवीशी वाटणारी व सर्वात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करणारी बाजार पेठ असलेली महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रेवर कोरोनाचे सावट कायम असल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन महाराष्ट्रातील यात्रा उत्सव बंद केले असुन म्हसा यात्रा रद्द करण्यात आली आहे.
संसारातील ग्रुह उपयोगी अनेक वस्तु मिळणारी, गुरांच्या खरेदी-विक्री ची सर्वात मोठी आर्थिक उलाढाल घडविणारी बाजार पेठ, खेळणी, पाळणी, मिठाई, ब्लँंकेट, घोंगड्या, भांडीकुंडी, संसार उपयोगी वस्तुंचे स्टाँल, आर्केस्ट्रा, तमाशे, जुनी परंपरा असलेली गळ लावणे, तळी फोडण्याचे नवस फेडण्यासाठी होणारी भाविकांची गर्दी, अशी अबाल व्रुद्धांना हवीहवीशी वाटणारी आणि शेजारील गोरगरीबांना दहा दिवस रोजगार उपलब्ध करून देणारी म्हसोबाची जत्रा यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे रद्द करण्यात आली आहे. सुमारे दोनशे वर्षाची परंपरा यंदा प्रथमताच खंडीत होत आहे.
कोरोनाचे प्रमाण गेल्या दोन महिण्यांपासुन फार कमी झाले आहे. दिवंसेंदिवस कोरोना रुग्ण कमी कमी होत आहेत. त्यामुळे प्रार्थना स्थळे, देवळे दर्शनासाठी खुली झाली आहेत. मात्र संभाव्य धोका टाळण्यासाठी सरकारने गर्दीच्या ठिकाणच्या यात्रा उत्सवारील बंदी कायम ठेवली आहे. खरेतर म्हसा यात्रे नंतर ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी यात्रा उत्सव सुरु होतात.ज्यामध्ये श्री मंलगगड, तिसाईदेवी, खंडोबा देवस्थान, शिवमंदीर, संगमेश्वर, गोरखगड, खोपिवली, माघी गणेशोत्सव, अशा उत्सवांवर कायम बंदी राहणार असल्यामुळे यात्रा उत्सवा निमित्ताने होणारी आर्थिक उलाढाल, रोजगार, दळणवळण यातून गोरगरीबांना मिळणा-या रोजगारावर दुष्परिणाम होणार असुन म्हसा यात्रा रद्द झाल्यामुळे ग्रामीण भागातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बाजार पेठ ,उद्योग धंदे, दुकाने जरी भरणार नसतील. तरी देवस्थान समिती व शासनाने किमान दर्शनासाठी आणि नवस फेडणा-यांसाठी मंदिरात प्रवेश द्यावा. अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
{यंदा यात्रा रद्द झाली असुन, देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने पुजा अर्चा विधीवत पणे केली जाईल. देवस्थान विश्वस्त म्हसा}
{शासनाच्या नियमानुसार सर्व ठिकाणच्या यात्रा उत्सवांवर अद्याप बंदी कायम आहे.--तहसीलदार अमोल कदम.}

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...