Tuesday 22 December 2020

वृक्षसंवर्धनाकडे वनविभागाचे दुर्लक्ष !

वृक्षसंवर्धनाकडे वनविभागाचे दुर्लक्ष !


कल्याण (उंबर्लि) :- "झाडे लावा झाडे जगवा" ही संकल्पना फक्त कागदोपत्री राहिली आहे. उंबर्लि गावातील वनविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जमिनीवर जवळपास ४०,००० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ही जमीन कल्याण तालुका आणि अंबरनाथ तालुका वनविभागात येते. ९ डिसेंबर रोजी उंबर्लि टेकडीवर आगलागल्यामुळे जवळपास २००० झाडांचे नुकसान झाले आहे. 


उंबर्लि, सोनारपाडा आणि दावडी ग्रामस्थ गेली २ वर्ष या वृक्षांचे सौंवर्धन आणि संगोपन करत आहेत. येथील ग्रामस्थांची तक्रार आहे की वनविभागाने झाडे लावली खरी पण त्याचे संगोपन करण्याचा त्यांना विसर पडला आहे. या झाडांचे संगोपन आणि सौरक्षण करण्याची जवाबदारी येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.
श्री. भास्कर पाटील, मुकेश पाटील,विजय पाटील, पांडू पाटील, डॉ. शिरोडकर, डॉ. नंदा यांनी संत सावळाराम वनश्री संस्था यांच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन आणि संगोपन करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे. गेल्या ३ वर्षांपासून श्रमदानातून उंबर्लि टेकडीच्या मध्यावर असणाऱ्या डबकेवजा पाणवठ्यावरून पाणी वाहून हा उपक्रम राबविला आहे. गावातील ग्रामस्थ सकाळी फेरफटका मारण्यासाठी टेकडीवर जातात तेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली की पाण्यावाचून ही झाडे लोप पावत चालली आहेत यांच्या संवर्धनासाठी आपण काही करू शकतो का? या परिसराचे आपणही घटक आहोत आपणही पर्यावरणाचा समतोल राखण्यास जवाबदार आहोत या भावनेतून हा उपक्रम गेले 3 वर्ष राबवत आहेत.
या ग्रामस्थांना टेकडीवर पाणवठ्याची काही सुविधा नसल्यामुळे टेकडीवर वन विभागातर्फे पाण्याची काही सोय सुविधा उपलब्ध झाल्यास आम्हाला मदत होईल अशी मागणी आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...