Tuesday 22 December 2020

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य" संघटनेची कोकण प्रदेश आढावा बैठक खेळीमेळीत संपन्न !!

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य" संघटनेची कोकण प्रदेश आढावा बैठक खेळीमेळीत संपन्न !!


नवी मुंबई - : अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र (राज्य) या सामाजिक  संघटनेची कोकण विभागीय आढावा बैठक समितीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे मार्गदर्शनाखाली तर प्रदेश सरचिटणीस मा. महेंद्र तथा अण्णा पंडीत यांचे अध्यक्षतेखाली "पटेल फार्म १२२ टीपीसि औद्योगिक वसाहत पावनेगांव कोपरखैरणे नवी मुंबई" या ठिकाणी  खेळीमेळीत संपन्न झाली. 


या बैठकीत स्वागताध्यक्ष म्हणून कोकण विभागीय अध्यक्ष संतोष चाळके यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प, शाल देवुन स्वागत केले. आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना प्रदेश अध्यक्ष रविंद्र दादा जाधव म्हणाले की अन्याय अत्याचार निर्मुलन समिती ही सामाजिक संघटना महाराष्ट्रभर कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमातुन उभी राहीलेली असुन पदाधिकाऱ्यांनी समाजातील शोषित, वंचीत असलेल्या घटकांच्या विकासासाठी नियोजनबद्ध रितीने कृती आराखडा तयार करुन या आराखड्याच्या माध्यमातून गोरगरीबांच्या विकासासाठी काम करावे तसेच गोरगरीब बेरोजगार व आर्थिक कमकुवत असलेल्या मागासवर्गीय अल्पसंख्याक समाजातील पिडीत व्यक्तींवर होणा-या अन्यायाविरुद्ध दंड थोपटून कायदेशीर व सनदशीर मार्गाने हिमालयासारखे त्यांचे पाठीशी उभे राहुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समीतीचा उपयोग करावा असे प्रतिपादन रविंद्रदादा जाधव यांनी आढावा बैठकीत केले.
या वेळेस महेंद्र तथा अण्णा पंडीत म्हणाले की कार्यकर्त्यांनी समितीच्या उद्देश व धोरणात्मक कार्यक्रमास आत्मसात करुन अन्याय होईल तिथे समितीच्या उद्देशानुसार जात पात वंश व वर्ण न बघता अन्यायग्रस्तांना सहकार्य करावे. कोकण विभागीय अध्यक्ष स्वागताध्यक्ष  संतोष चाळके यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत केले. संपूर्ण कोकण विभागात समितीच्या शाखा खोलुन जानेवारीत *"कोविड योध्दा चा सन्मान व प्रबोधनात्मक मेळावा"*  पनवेलला आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या आढावा बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना समितीचे पदे देवुन जबाबदारी सोपवुन सन्मानित करण्यात आले.
या बैठकीस पनवेल तालुकाध्यक्ष राज भोईर, कोकण विभागीय महीला संघटक मा.ममता झंवर,
नवी मुंबई जिल्हाप्रमुख मा.रमेश खिल्लारे, विक्रम फुलोरे, ठाणे जिल्हा संघटक अमित साळवे, कल्याण ता.संघटक सुनिल भोसले, परेश लोंढे, रतन कडु, सुहास सोनवणे, रत्नदीप जोशी, यश झवर, रोशन कडु, आशिष गुप्ता, अंबरनाथ-उल्हासनगर ता.अध्यक्ष दिपक मागाडे आदिंसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीचे सुत्रसंचालन सुनिल भोसले, अमित साळवे यांनी केले तर आभार रमेश खिल्लारे यांनी मानले. स्नेहभोजना नंतर राष्ट्रगीताने आढावा बैठकीचा समारोप करण्यात आला.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...