Tuesday 22 December 2020

अखेर टेक्नोक्राफ्ट कंपनी धानिवलीच्या आडमुठे धोरणाविरोधात **सिटु कामगारांचे आमरण उपोषण सुरु **

अखेर टेक्नोक्राफ्ट कंपनी धानिवलीच्या आडमुठे धोरणाविरोधात **सिटु कामगारांचे आमरण उपोषण सुरु **


**गाव बचाव समितीच्या कराराचाही केला भंग ,स्थानिक कामगार झाले बेरोजगार **


मुरबाड (मंगल डोंगरे) : गेल्या 9 महिण्यां पासुन लाँकडाऊनच्या नावाखाली कामगारांच्या कमजोरीचा गैरफायदा घेत टेक्नोक्राफ्ट पाँवर डिव्हिजन (विज निर्मिती) कंपनी बंद करण्याच्या निमित्ताने सुमारे 60--65 कायम स्वरुपी कामगारांना कुठल्याही प्रकारची पुर्व सुचना न देता एकाएकी कामावरुन काढुन टाकल्याची घटना घडली. तसेच गावबचाव समिती सोबत केलेल्या कराराचाही भंग करून धानिवली येथील भुमिपुत्रांना बेरोजगार केल्याच्या निषेधार्थ आज अखेर सिटु संघटनेच्या झेंड्याखाली सर्व कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
                 सिटु संघटनेचे अध्यक्ष डॉ. डि.एल. कराड, यांनी वेळोवेळी या कामगारांना कामावर घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापना बरोबर पत्रव्यवहार केले. मोर्चे काढण्यात आले. आंदोलने ही झाली. मुरबाड तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनाही वेळोवेळी पत्रव्यवहार करून कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती केली गेली. मात्र ढिम्म प्रशासन कर्ते व विकलेली कायदेव्यवस्थे पुढे गोरगरीब कामगार भरडले गेले. त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गातील शेवटचे हत्यार काढावे लागले आणि सुरु झाले **आमरण उपोषण **आज असही मरायचे आहे आणि तसेही.
                लाँकडाऊनची संधी साधत कंपनीने कुठलीही पुर्व सुचना न देता तडकाफडकी कंपनी बंद करण्याचा बहाणा करत सर्व कामगारांच्या झालेल्या सर्व्हिसचा हिशोब हाती न देता किंवा चर्चा करता पोष्टाद्वारे घरपोच करत त्या कामगारांना कायद्याचा आधार ही घेवु दिला नाही.
                 जवळपास 15 वर्षापासून टेक्नोक्राफ्ट कंपनीची डेन्यूब हि पहिली शाखा धानिवली येथे सुरू झाली. त्यावेळी कंपनी व्यवस्थापनाने धानिवली गाव बचाव समिती सोबत अनेक अटी शर्ती असलेला एक करार केला.ज्यामध्ये स्थानिक भुमिपुत्रांना प्राधान्य देवून 100 % कायम स्वरुपी सेवेत सामावुन घेतले जाईल. कोणाच्या शेतीचे, जनावरांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई केली जाईल. गावातील व्यक्तीस PRO  म्हणून नेमले जाईल. या गावातील कंत्राटी पद्धतीने काम करणा-या तरुणांना सहा महिण्यात कायम सेवेत कंपनीच्या रोलवर घेतले जाईल. नव्याने भरतीची आवश्यकता भासल्यास या.गावातील 50--50 तरुणांना मागणी प्रमाणे सेवेत सामावून घेतले जाईल व कायम करण्यात येतील. तसेच धानिवली गावातील लोकांना मौजे पशेणी येथील हाँस्पिटल मध्ये 50 % सवलतीने वैद्यकीय सेवा आणि मुलांसाठी 50 % सवलती ने पशेणी येथील शाळेत शिक्षण सुविधा पुरविली जाईल. धानिवली पुला पासून गावात जाणारा रस्ता काँक्रीटीकरण व विद्युत रोषणाई करून दिली जाईल. गावातील गणपती मंदिर बांधून, मंदिराकडे जाणारा रस्ता काँंक्रीट केला जाईल.गावासाठी व्यायाम शाळा, समाज मंदिर, बांधून दिले जाईल. विजनिर्मिती कंपनी बांधण्यासाठी गावातील ठेकेदाराला काम दिले जाईल. बिल्डींग मटेरियल याच गावातील सप्लायर्स कडुन घेतले जाईल. अशा प्रकारचा करार कंपनी सुरु होण्यापुर्वी या कंपनीने केला असताना, यातील कुठल्याही बाबीची पुर्तता न करता कंपनीने धानिवली गावाच्या तोंडाला पाने पुसुन त्यांच्या मुलाबाळांना तबकाफडकी कामावरुन काढून टाकल्याच्या निषेधार्थ आज अखेर सिटु संघटनेने दंड थोपटुन आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...