Wednesday 23 December 2020

मुलभूत सोईसुविधाची गैरसोय तरीही ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी?

मुलभूत सोईसुविधाची गैरसोय तरीही ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी?


कल्याण (संजय कांबळे) : गावा गावात ग्रामपंचायतीच्या वतीने पुरविण्यात येणा-या मुलभूत सोईसुविधाची पुरती वानवा असताना पुन्हा एकदा सरपंच, उपसरपंच, सदस्य होण्यासाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूकांची तयारी सुरू केली आहे.
माहे एप्रिल डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणा-या आणि नव्याने स्थापित झालेल्या तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. मानिवली, निंबवली मोस, गुरवली, वडवली शिरडोण, वरप, आपटी मांजर्ली, सांगोडा कोंढेरी, नवगाव बापसई, जांभूळ, मोहिली, म्हसकळ, नडगाव दांणबाव, रायता पिंपळोली, खोणी वडवली, म्हारळ, उतणे चिंचवली, गोवेली रेवती, राया ओझर्ली, कांबा, घोटसई, तर तिकडिल नागांव, दहिसर, वाकळण, आदी ग्रामपंचायती चा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांपासून या गावातील नागरिकांच्या मुलभूत सोईसुविधा पुर्ण झाल्याका याचा विचार व्हायला हवा.
रायते पिंपळोली गावात स्मशानभूमी नाही, म्हारळ वरप येथे कच-याची समस्या बिकट आहे, तर इतर ग्रामपंचायतींमध्ये गटारे, सांडपाणी, अंतर्गत रस्ते, पाणी, आदी समस्या आहेत तशाच आहेत. निवडणूका आल्या की मेजवान्या, पार्ट्या, आल्याच, मतदारांना यामध्ये सामिल केले की पुढची ५ वर्षे आर्थिक गणित सोडविण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील राहतो. थोड्याश्या अमिशापोटी आपण आपला हक्क, अधिकार विकतो, गहाण ठेवतो याची जाणीव मतदारांना नसल्याने पुन्हा तेच तेच निवडून येतात. या घाणेरड्या राजकारणापायी चांगले, सुक्षिशीत तरुण तरुणी या निवडकापासून लांबच राहतात. यातूनही कोणी निवडणूक रिंगणात उतरलाच तर तो खर्च करु शकत नसल्याने मतदार देखील त्याला मतदान करित नाही. ही सत्यता कोणीही नाकारू शकणार नाही.
कल्याण तालुक्यातील २१ पैकी बहुतेक ग्रामपंचायती बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी शिवसेना भाजपा एकत्र आले आहेत. तर अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस निम्म्यापेक्षा जास्त जागांवर मुंसडी मारेल असा विश्वास तालुका अध्यक्ष जयराम मेहेर यांनी व्यक्त केला आहे. तर गेली कित्येक वर्षे खुर्चीत बसून गावात स्मशानभूमी सारखी मुलभूत सुविधा निर्माण करु न शकणारे विरोधात आपण निवडणूकीत उतरणार असे रायते येथील सुदाम भोईर यांनी सांगितले. तसेच आपण केलेल्या सामाजिक कामामुळे आपण निवडून ही येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मतदारांनी जागृत पणे मतदान करुन आपला प्रतिनिधी योग्यच निवडावा ऐवढीच माफक अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...