Saturday 26 December 2020

रोटरी क्लब चोपडा तर्फे एसटी बस चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न. !

रोटरी क्लब चोपडा तर्फे एसटी बस चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न. !


-१५० बस चालकांनी घेतला लाभ

चोपडा वार्ताहर :-
रोटरी एक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था आहे व सतत समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये आपले सेवाभावी योगदान देत आले आहे, त्यात रोटरी क्लब चोपडा चे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत असताना कोरोना काळात सुद्धा सेवा देण्याचे कार्य अविरत सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून या शिबिरा अंतर्गत चोपडा बस स्थानकात असलेले सुमारे दीडशे बस चालकांचे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली, सदर शिबिर हे श्री गणेशा नेत्रालय, पाठक गल्ली, चोपडा येथे नुकतेच पार पडले.
सदर शिबिराचे उद्घाटन चोपड्यातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. श्री दीपक ओ. पाटील(साई) यांच्या शुभहस्ते करण्यात आले, सोबत रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव सचिव रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख डॉ. सचिन कोल्हे व संदेश क्षीरसागर उपस्थित होते.
कोरोना काळानंतर एसटी बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यात एस टी बस चालकाची भूमिका ही महत्वाची व जबाबदारीची असल्या कारणाने रोटरी क्लब चोपडा ने बस चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचे ठरवले असे अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी सांगितले.
  सदर शिबिर नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.सचिन कोल्हे यांचा मार्गदर्शनात पार पडले, तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावयाची याबाबतचे मार्गदर्शनही करण्यात आले.
"सध्याच्या धावपळीच्या युगात मधुमेह हा सर्वसामान्य आजाराप्रमाणे पसरत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास याचे परिणाम शरीरावर होतात. मात्र, याचा मोठा फटका बसतो तो डोळ्यांना. डोळ्यांच्या आतील नेत्र-पटलावर म्हणजे रेटीनावर देखील मधुमेहाचे दुष्परिणाम होऊन पूर्णपणे अंधत्त्व येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी वेळीच निदान होऊन त्यावर उपचार होणे गरजेचे असते" असे डॉ.दीपक पाटील यांनी सांगितले व
त्यांनी शिबिराच्या दरम्यान भेट देऊन शिबिराची पाहणी केली.
  शिबिर यशस्वी होण्यासाठी रोटरी चे पंकज बोरोले, प्रवीण मिस्त्री चंद्रशेखर साखरे, प्रफुल्ल गुजराथी, एम डब्ल्यू पाटील, अनिल अग्रवाल व श्री गणेशा नेत्रालयाचे सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले तर रोटरी चे असिस्टंट गव्हर्नर योगेश भोळे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...