Saturday 29 October 2022

अंगणवाडीच्या बालकांची खाऊ शिजवण्याची बिले अदा करा - *काम्रेड अमृत महाजन*

अंगणवाडीच्या बालकांची खाऊ शिजवण्याची बिले अदा करा - *काम्रेड अमृत महाजन*


चोपडा, बातमीदार.. महाराष्ट्र राज्य भर गेल्या मे २२ महिन्यापासून अंगणवाड्या उघडल्यानंतर त्या बालकांच्या हजेरीने गजबजू लागल्या आहेत. त्या अंगणवाडीतील मुलांना स्थानिक बचत गटांमार्फत वा बचत गट मिळाला नाही तर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना विनंती करून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रशासन अंगणवाडीतील बालकांना खाऊ पूरवत आहे. रोज किमान २० ते १०० लाभार्थी यांना ताजा शिजवलेला खाऊ पुरवला जातो, अशा तऱ्हेने राज्यात लाखभर अंगणवाडी मध्ये बचत गटांमार्फत वा अंगणवाडी कर्मचारी मार्फत वाटला जातो. त्यांची बिले सरकारने पाच महिन्यापासून दिलेली नाहीत. त्यामुळे त्यांना व्याजाचे पैसे काढून उधार उसनवारीने जास्तीचे जास्तीचे पैसे मोजून खाऊ वाटप करावा लागतो. हा खाऊ योग्य मापात दिला नाही तर बचत गटांना जबाब विचारला जातो. परंतु गेल्या पाच महिन्यापासून खाऊ शिजवण्याची बिल मिळालेली नसल्यामुळे खाऊ पुरवणारे गट व कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आदिवासी भागात तर लाभार्थी संख्या खूपच मोठी असते त्याचे आर्थिक हाल व शोषणाला पारावारच राहिला नाही संबंधित कार्यालयांना समस्या मांडावी तर ते थातुर मातुर उत्तरे देऊन वेळ निभावून नेतात. त्यांची जळगाव जिल्हा परिषदेमध्ये वा महाराष्ट्र शासनाकडे दाद पुकार घेतली जात नाही. एकदा घेतलेला ठेका रद्द करता येत नाही म्हणून बचत गटांतर्फे शिजवला जाणारा खाऊचे बिल महाराष्ट्र शासनाने व जिल्हा प्रशासनाने त्वरित अदा करावीत. अशी मागणी जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे नेते कॉम्रेड अमृत महाजन, जिजाबाई राणे, लक्ष्मीबाई नाकाडे, यमुना बाई धनगर, सुमनबाई पाटील, सारुबाई कोळी, ठगु बाई भोई, मंगला सुशीलाबाई पाटील, मंगला कुमावत, देवकाबाई धनगर, मालू बाई धनगर, रंजना धनगर, लताबाई धनगर, सुशीला बाविस्कर, प्रतिभा डोळे  वैशाली महाजन, सुनंदा बाई चौधरी, शोभाबाई कोळी,  जनाबाई पाटील, बचत गट संघटना पदाधिकारी यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...