Sunday 30 October 2022

पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीचा 'दणका, विद्यूत मंडळाच्या वरीष्ठ आधिकां-याकडून दखल, खांब बदलण्याचे काम सुरू !

पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीचा 'दणका, विद्यूत मंडळाच्या वरीष्ठ आधिकां-याकडून दखल, खांब बदलण्याचे काम सुरू !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील जेष्ठ पत्रकार संजय कांबळे यांनी दैनिक सागर, दैनिक, महाभारत, आपले महानगर, महानगरी टाईम्स, माझा बातमीदार, ऐबी जनमत न्यूज,आदी विविध प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मिडिया मधून'संभाव्य जीवीतहानी टाळण्यासाठी आदिवासी तरुणांचा विद्यूत मंडळाला बांबू, आमदार खोके घेऊन ओके, शेतकऱ्यांचे काय? बळीराजाचा सवाल ! अशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होतात, विद्यूम मंडळ खडबडून जागे झाले, ऐवढेच नव्हे तर रविवारी सुट्टी असताना ही हे कर्मचारी, अधिकारी जागेवर जाऊन, सत्य परिस्थिती लक्षात घेऊन वाकलेले लाईटचे खांब बदलण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


कल्याण तालुक्यातील टिटवाळा शहापूर रस्त्यावर वसलेल्या उशीद गावापासून ५००/७०० मीटर अंतरावर असलेल्या हाल टोपलेपाडा येथे काही वर्षांपूर्वी परशुराम भागरे या शेतकऱ्यांच्या दुभत्या म्हशीचा शाँक लागुन मृत्यू झाला होता. या परिसरातील ६ लाईटच्या खांबापैकी २ खांब पुर्णपणे वाकलेले/ झुकलेले आहेत, यांच्या तारा जमिनीबरोबर लोंबकळत आहेत, हे धोकादायक असल्याने येथील अनंता भागरे, विनोद जाधव आदींनी विद्यूत कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सांगितले होते. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेरीस तालुक्यातील संवेदनशील पत्रकार संजय कांबळे यांनी वरील मथळ्याखाली फोटोसहित विविध दैनिकातून बातमी प्रसिद्ध करताच विद्यूत मंडळ खडबडून जागे झाले.

                           (काम सुरू असताना)
खडवली, टिटवाळा आणि गुरवली विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आज रविवारी सुट्टी असताना सकाळीच उशीद हल गावाजवळील टोपलेपाडा येथील संबंधित वाकलेल्या खांबांची स्थळ पहाणी करून ताबडतोब पोल बदलण्याचे काम सुरू केले. 

                                (काम पुर्ण झाले)
शिवाय परशुराम भागरे यांच्या मृत म्हशींचे नुकसानभरपाई चे काम नक्की कुठे अडले आहे, याची स्वतः चौकशी करण्याचे आश्वासन दिले.


दरम्यान खडवली, गुरवली, टिटवाळा या सेक्शन अंतर्गत ५५० ट्रान्सफार्मर आहेत, खडवली शाखेतंर्गत १८ जणांविरोधात १४ लाख ३७ हजार रुपयांची वीज चोरी प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत ४०६ जणांविरोधात कारवाई करून १ कोटी ९४ लक्ष रुपयांची वीज चोरी उघड केली आहे. खडवली शाखेतर्फे आतापर्यंत ६६ लाखाच्या वीजचोरी प्रकरणी १३१ जणावर, टिटवाळा शाखातंर्गत ९८ लाखाची वीजचोरी, मांडा शाखेतर्फे ३० लाख वीजचोरी प्रकरणी ६० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेवर वीजबिल भरून सहकार्य करावे तसेच अधिकृत कर्मचाऱ्यांशिवाय लाईटचे काम करु नये, ते बेकायदेशीर व जीवावर बेतणारे ठरु शकते, असे विद्यूत मंडळाच्या वरीष्ठ अधिकां-यांनी सांगितले. तर पत्रकार संजय कांबळे यांच्या वस्तूनिष्ठ बातमीची दखल घेऊन तात्काळ धोकादायक खांब बदलण्याचे काम सुरू केल्याबद्दल विद्यूत मंडळाच्या अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार कांबळे यांचे अनंता भागरे या शेतकऱ्यांकडून व ग्रामस्थांनकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...