Monday 31 October 2022

सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करत महापौर सह नागरिकांची एकतेसाठी मोटार सायकल रॅली !

सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करत
महापौर सह नागरिकांची एकतेसाठी मोटार सायकल रॅली !


जळगाव, अखलाख देशमुख, दि ३१ : राष्ट्रीय एकता दिवस तथा भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जळगाव येथे सोमवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी शहरातील काव्यरत्नावली चौक येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई यांच्या प्रतिमेला प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शहरात मोटारसायकल रॅली ला सुरुवात झाली. लोहपुरुष यांच्या प्रति श्रद्धाभाव यात दिसला. भोरगाव लेवा पाटीदार पंचायत पाडळसे जळगाव विभाग, सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्दिशीय संस्था, अखिल भारतीय लेवा विकास महासंघ जळगाव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

महापौर सौ. महाजन यांच्या सह शहरातील लेवा पाटीदार समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, कर्मचारी, शेतकरी तसेच सर्व समाजातील बंधू भगिनीनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती देत एकतेचा संदेश दिला. सदर मोटारसायकल रॅली काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेडियम, शिवाजी पुतळा, मनपा इमारत, चित्रा चौक, पुष्पा बेंडाळे चौक, पांडे चौक, बीएसएनएल कार्यालय मार्गे लेवा भवन येथे रॅलीची सांगता झाली. लोहपुरुष सरदार पटेल यांना मान्यवरांनी अभिवादन केले.स्वातंत्र्य लढ्यात सरदार पटेल यांचे योगदान याबद्दल मान्यवरांनी मनोगतात इतिहासाला उजाळा दिला. या कार्यक्रमात महापौर सौ. जयश्री महाजन, जळगाव शहराचे आमदार श्री. सुरेश दामू भोळे उर्फ राजुमामा, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डाँ. श्री. उल्हास पाटील, डाँ सौ. केतकी पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेनेचे जळगाव महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यासह समाजातील ज्येष्ठ, प्रतिष्ठित विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. राष्ट्रीय ऐकता , बंधुभाव हा संदेश ही यातून दिला गेला.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...