Monday 31 October 2022

नमन व जाखडी लोककलेचं एकत्रित धुमशान "कोकणचा साज संगमेश्वरी बाज" कार्यक्रमाचे ५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आयोजन !

नमन व जाखडी लोककलेचं एकत्रित धुमशान "कोकणचा साज संगमेश्वरी बाज" कार्यक्रमाचे ५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आयोजन !


*ठाणे: उदय दणदणे*

मुंबईतील दामोदर नाट्यगृह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी - राजन तिरवडेकर, जयवंत सातोसकर, अशोक साळुंखे, दिलिप बंडागळे, महेश शिरवडकर, कमलाकर पाटकर, उत्तम ढोलम, विजय पडये, भारती एस्. संकल्पित व दामोदर नाट्यगृह चतुर्थश्रेणी कर्मचारी आयोजित शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी दामोदर नाट्यगृह परळ, मुबंई येथे रात्रौ ०८.३० वा. समर्थ कृपा प्रोडक्शन रत्नागिरी प्रस्तुत. *"कोकणचा साज संगमेश्वरी बाज"* या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संगमेश्वरी शैलीत खास चमचमीत- चटकदार , चुटके,गाणी, त्याचबरोबर कोकणातील नमन,जाखडी,लोककलांचे खास संगमेश्वरी बोलीत विनोदी शैलीत एकत्रित असं धुमशान सादरीकरण होणार आहे. 

दामोदर नाट्यगृह हे मुबंईतील एक सुप्रसिद्ध नाट्यगृह असून सदर नाट्यगृहात- नाटक ,लावणी, व कोकणातील लोकप्रिय नमन, जाखडी, दशावतार, भारुड, या लोककला सर्वाधिक सादरीकरण होत असतात, त्याचबरोबर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने होत असतात.

रंगमंचावर होणारे कार्यक्रम नियोजनबद्ध होण्यासाठी हॉल मॅनेजमेंट बरोबरच कर्मचाऱ्यांचाही फार मोठा सहभाग असतो.

नाट्यगृहात कार्यरत असणारे डोअरकिपर यांना मानधन हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमानुसार मिळत असते. कधी कधी व्यावसायिक नाटक व इतर कार्यक्रम काही तांत्रिक कारणांमुळे अचानक रद्द केले जातात. अशावेळी सदर कर्मचाऱ्यांना मानधन मिळत नाही प्रसंगी कर्मचारी आर्थिक संकटात येतात. या विवंचनेतुन कर्मचाऱ्यांना थोडासा का होईना ! दिलासा मिळावा म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दामोदर नाट्यगृह व्यवस्थापक, सोशल सर्व्हिस लीग, सहकारी मनोरंजन मंडळ व दामोदर हॉल मॅनेजर -सुभाष माळोदे, सुंदर परब, वैभव तांबे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तरी कलाक्षेत्रातील सर्व आयोजक, निर्माते, लेखक दिग्दर्शक,कलाकार, रसिक प्रेक्षकांनी सदर उपक्रमास बहुमूल्य योगदान देऊन व आयोजित केलेल्या मनोरंजन कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहून सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी. भारती एस,- ९०२९८६७९६७ / ९४०४८६७९६७ राजन तिरवडेकर- ८१०८९९८९६८ अशोक साळुंखे- ८७६७३७४६०१ यांच्याकडे संपर्क साधावा. असे आवाहन दामोदर नाट्यगृह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...