अहमदनगर, अखलाख देशमुख, दि ३१ : राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीत बळीराजा पुरता खचला आहे. शेतकऱ्याला या संकटातून बाहेर येण्यासाठी उशीरा का होईना राज्य सरकारला शहाणपण सुचले आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वस्त केले. मात्र या नुकसान भरपाईत शेतकऱ्यालाच लुटण्याचे काम होत आहे. ही घटना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच जिल्ह्यात आढळून आली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आलेले अधिकारी बेधुंदपणे शेतकऱ्यांकडून पाहणीसाठी पैसे मागत आहेत. त्यांना कोणाचा वरदहस्त आहे ज्यातून उघडउघड लुटमार करण्याची हिंमत अधिकाऱ्यांना झाली आहे, याचा खुलासा राज्य सरकारने करावा. अन्यथा आपलं सरकार हे बळीराजाच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार आहे यावर निश्चितपणाने शिक्कामोर्तब होईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले जवान नंदन रघुनाथ जाधव यांचा चांबळे ग्रामस्थांच्यावतीने कृतज्ञता सन्मान...
सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले जवान नंदन रघुनाथ जाधव यांचा चांबळे ग्रामस्थांच्यावतीने कृतज्ञता सन्मान... वाडा, प्रतिनिधी : वाडा...
-
कडोंमनपा स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर कमावतात महिन्यात पाच लाख रुपये - माहिती अधिकार कार्यकर्ते मेढेकर *** आयुक्तांचे यांच्यावर नाही नि...
-
वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक ! मुंबई, प्रतिनिधी : केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989...
-
कल्याण स्टेशन परिसरात ट्रॅफिक ची जीवघेणी कोंडी. कल्याण पश्चिम मधील नागरीकांची 'रोज मरे त्याला कोण विचारे' अशी अवस्था !! ** स्मृती फा...
No comments:
Post a Comment