Friday 28 October 2022

संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सरकार त्याच्या पाठिशी आहे असा आत्मविश्वास निर्माण होणारे काम राज्य सरकारने करावे - विरोधी पक्षनेते अजितदादा पवार

संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सरकार त्याच्या पाठिशी आहे असा आत्मविश्वास निर्माण होणारे काम राज्य सरकारने करावे - विरोधी पक्षनेते अजितदादा पवार 


पुणे, अखलाख देशमुख, दि २८ : महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारशी केलेल्या पत्रव्यवहाराबाबत आज विरोधी पक्षनेते अजितदादांनी प्रकाश टाकून विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या भूमिकेची आठवण करून दिली. यावेळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सरकार त्याच्या पाठीशी आहे असा आत्मविश्वास निर्माण होईल असे काम राज्य सराकारने करावे अशी आग्रही मागणी अजितदादांनी शिंदे- फडणवीस सरकारकडे केली. आज पुणे शहर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा माध्यमांसमोर मांडला. 

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे त्यावर बोलताना अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या एका पत्राचा उताराच वाचून दाखवला. हे पत्र वाचून झाल्यावर विरोधी पक्षनेते म्हणाले की, या पत्रातील उद्धव ठाकरे यांचे नाव बाजूला करून त्याठिकाणी विद्यमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे नाव टाकावे लागेल, असा चिमटा त्यांनी काढला. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी केलेले आवाहन आज जशास तसे लागू होते. आज देवेंद्र फडणवीस स्वत: अर्थमंत्री, नियोजन मंत्री व उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस मिळून चांगले सरकार चालवत आहेत असा त्यांचा ग्रह आहे. त्यामुळे आता त्यांनी लोकांना मदत करून संकटातून बाहेर काढावे, अशी आग्रही मागणी अजितदादांनी केली.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...