Thursday, 27 October 2022

चंदनसार, भाताने, पारोळ येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स, डॉक्टर, आशा वर्कर यांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून कृतज्ञेची भाऊबीज भेट....

चंदनसार, भाताने, पारोळ येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स, डॉक्टर, आशा वर्कर यांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून कृतज्ञेची भाऊबीज भेट....


वसई, प्रतिनिधी : मागील दोन वर्षांपासून आरोग्य यंत्रणा, कायदा व सुव्यवस्था समर्थपणे सांभाळणाऱ्या वसई विरार तालुक्यातील आशाताई, परिचारिका डॉक्टर भगिनींसाठी आजची भाऊबीज आनंदाची ठरली. 


जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून यासर्व भगिनींना पैठणी व चांदीची भेट वस्तु देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाचे महाभयंकर संकट पसरल तेव्हापासून आजपर्यंत आपल्या कुटूंबाची काळजी न करता कोरोनाच्या संकटाचा सामना करत लढत राहिल्या त्या आपल्या आशाताई परिचारिका, डॉक्टर भगिनींचे 2020 2021 वर्षाप्रमाणे यावर्षीही जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने त्यांचा विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पैठणी भेटीच्या रूपाने जिजाऊची कृतज्ञेची भाऊबीज भगिनींपर्यंत पोहचवत साजरी केली.

आपण ज्या समाजात जन्माला आलो आहोत त्या समाजाचे काहितरी देणेकरी लागतो सर्व समाजाचे आपल्यावर अनेक ऋण असतात हे ऋण फेडण्यासाठी छोटासा प्रयत्न म्हणुन स्वखर्चातुन समाजाची सेवा करण्याचे ध्येय निलेश सांबरे यांचे असुन आरोग्य, शिक्षण, कला - क्रिडा महिला सक्षमीकरण, शेती व आदी सामाजिक क्षेत्रात जिजाऊ संस्था अग्रक्रमाने उपक्रम राबवत असुन समाजाचा विकास करणे हेच एकमेव ध्येय असुन मानवतेच्या कल्याणासाठी जिजाऊ संस्था कार्य करत असुन आपल कर्तव्य पार पाडत आहे.
पैठणीची आपुलकीची भेट स्विकारताना आपल्या भगिनींच्या चेहर्‍यावर फुलणारा आनंद सर्वांचाच हुरूप वाढवतो. 

आपल्या जिवाची पर्वा न करता समाजाची आरोग्य सेवा करणारया आशाताई, परिचारिका, डॉक्टर, भगिनींना स्नेहाची जिजाऊ पैठणी भेट देण्यासाठी जिजाऊ संस्थेचा तालुका प्रमुख हर्षालीताई खानविलकर तसेच स्थानिक पक्षाचे समाजसेवक व जिजाऊ संस्थेचे स्वयंसेवक उमेश घरत, अमित नाईक, उन्मिका पाटील, योगिता घरत, असिफ शेख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

"कोकण रत्न" पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे आवाहन !!

"कोकण रत्न" पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे आवाहन !! मुंबई (शांताराम गुडेकर) :           ...