Thursday, 27 October 2022

संतोष जैतापकर यांचे समाजाशी अतूट नातं ५००० हजार सुगंधी उटण्याचे वाटप ठरले लक्षवेधी !

संतोष जैतापकर यांचे समाजाशी अतूट नातं ५००० हजार सुगंधी उटण्याचे वाटप ठरले लक्षवेधी !


कोकण / गुहागर : उदय दणदणे 

समाजनेते तसेच भाजपा ओबीसी मोर्चा - उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष- संतोष जैतापकर यांच्या वतीने गुहागर विधानसभा मतदार संघात प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दिवाळी सणानिमित्त "सुगंधी उटणे" वाटप करण्यात आले.


त्याचबरोबर गुहागर विधानसभा मतदार संघातील मुबंईस्थित व ठाणे, पालघर, विरार, नालासोपारा येथील चाकरमान्यांना जवळ जवळ ५ हजार पेक्षा अधिक दिवाळी निमित्त "सुगंधी उटणे" वाटप करण्यात आले.

आम्ही गुहागरकर रिक्षा संघटना (विरार) यांनाही सदर उटणे वाटप करण्यात आले.

भाजपा गुहागर तालुका विरार आणि मुंबई पदाधिकारी यांनी हे उटणे सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यात प्रामुख्याने रमेश आग्रे, मनोज डाफले, अनिकेत चाळके, दिनेश नवरत, एकनाथ बारस्कर, आदि कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले.

विरार शहरात "सुगंधी उटणे" वाटप प्रसंगी 
विरार भाजपा अध्यक्ष- नारायण मांजरेकर, कोकण विकास अध्यक्ष- निलेश पानदे, व इतर सहकारी पदाधिकारी उपस्थित होते.

1 comment:

  1. फारच सुंदर उपक्रम

    ReplyDelete

कल्याण मध्ये रंगला नगरकर प्रिमियर क्रिकेट लिग स्पर्धचा थरार !

कल्याण मध्ये रंगला नगरकर  प्रिमियर  क्रिकेट लिग स्पर्धचा  थरार ! कल्याण, प्रतिनिधी - कल्याण मध्ये आम्ही नगरकर प्रतिष्ठान आयोजित ...