Friday 28 October 2022

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांशी बैठक संपन्न, सकारात्मक विचार !

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांशी बैठक संपन्न, सकारात्मक विचार !


कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन कल्याण तालुक्याच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्याशी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन श्री भवारी यांनी दिले.


कल्याण तालुक्यातील ४६ ग्रामपंचायत मध्ये सुमारे १९८ कर्मचारी आहेत, घरपट्टी, पाणीपट्टी, साफसफाई यासह विविध कामामध्ये यांचा सहभाग महत्त्वाचा असतो, विविध शासकीय योजना राबविण्यात ग्रामसेवकांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करत असतात. जन आरोग्य, आयुष्यमान भारत नोदणी मध्ये यांचे मोलाचे योगदान आहे, असे असलेतरी एक दोन कामचुकार व गुंडप्रवृतीच्या कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण संघटनेची बदनामी झाली होती, याचा अनुभव पंचायत समितीच्या वरीष्ठ अधिका-यांना देखील आला होता. हे कटू सत्य असले तरी कर्मचाऱ्यांचे योगदान नजरेआड करता येणार नाही.


त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन चे ठाणे जिल्हा अध्यक्ष अजय जाधव, कल्याण तालुका अध्यक्ष सुरेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन आज कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांना देण्यात आले. यामध्ये शासनाकडून किमान वेतन ५०, ७५' व १०० टक्के अदा करण्यात येत असले तरी उर्वरित किमान वेतन हिस्सा व राहणीमान अनेक ग्रामपंचायतीकडून दिला जात नाही, सेवा पुस्तके अद्ययावत करून मिळावे, नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट झालेली १४ गावे व ५ ग्रामपंचायत मधील सुमारे ४३ कर्मचाऱ्यांना दाखला द्यावा, १० टक्के नस्ती सन २०२१/२२ नुसार घेण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश असून बीडिओ यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले शिवाय कर्मचाऱ्यांकडून वसूली कामात हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यास गटविकास अधिकारी अशोक भवारी हे विसरले नाहीत.

एकूणच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची आजची बैठक अंत्यत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, यावेळी ग्रामसेवक संघटनेचे प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवक जगदीश मडके उपस्थित होते. तसेच विविध ग्रामपंचायतीचे कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...