Thursday, 27 January 2022

आता महाराष्ट्रात किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाइन, मंत्रिमंडळाची मंजुरी; भाजप म्हणे- हे सरकार बेवड्यांना समर्पित !!

आता महाराष्ट्रात किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाइन, मंत्रिमंडळाची मंजुरी; भाजप म्हणे- हे सरकार बेवड्यांना समर्पित !!


भिवंडी, दिं, 28, अरुण पाटील (कोपर) :
            राज्यातील सुपर मार्केटस आणि किराणा दुकानांमध्ये वाइन मिळण्याचा मार्ग मोकळा  झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक दुकानांमध्ये वाइन विक्री करता येऊ शकणार आहे. राज्य सरकारने वाईन विकण्याची परवानगी दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
                 महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते त्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे नवाब मलिक म्हणाले. दरम्यान, किराणा दुकान आणि जीवनावश्यक वस्तू मिळण्याच्या ठिकाणी म्हणजेच सुपर मार्केटमध्ये सुद्धा वाईन विक्री केली जाणार आहे. पण त्यासाठी किराणा दुकान हे एक हजार चौरस फुटापेक्षा मोठे असले पाहिजे ही अट घालण्यात आली आहे. दुकानात यासाठी एक शोकेस बनवून वाईन विक्री करता येणार आहे, असे सरकारने अध्यादेशात म्हटले आहे .
           या प्रस्तावाला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. भाजपचे नेते प्रविण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयावरुन जोरदार टीका केली आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पीत आहे, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
              तर महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !  *शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाची कारवाई ची मागणी* नालासोपारा, प्रतिनिध...