Saturday, 29 January 2022

कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांचे ज्वेलर्स असोसिएशन बैठकीत सी.सी. टी.व्ही. बसविण्याचे आवाहन !! "अध्यक्ष प्रकाश जे. शंकलेशा यांचे सहकार्याचे आश्वासन"

कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांचे ज्वेलर्स असोसिएशन बैठकीत सी.सी. टी.व्ही. बसविण्याचे आवाहन !! "अध्यक्ष प्रकाश जे. शंकलेशा यांचे सहकार्याचे आश्वासन"


कल्याण, हेमंत रोकडे : कोळसेवाडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्वतेतील ज्वेलर्स असोसिएशन बैठक करण्यात् आली. या बैठकीत आस्थापनामध्ये सी.सी. टी.व्ही. कॅमेरा बसविण्यात यावे. “१ कॅमेरा समाजासाठी, देशासाठी" समर्पित करावा असे  सांगण्यात आले. जेणे करून वाढत्या गुन्हेगारी वर आळा घालता येईल आणि लवकरचं आरोपीला पकडण्यास मदत होईल. 



यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी  कल्याण पूर्वेतील ज्वेलर्स असोसिएशन अध्यक्ष प्रकाश जे शंकलेशा यांच्या अध्यक्षतेखाली ज्वेलर्स दुकानादरची बेठक घेऊन त्यांना निवेदन पत्र देऊन सामाजिक उपक्रम म्हूणन सी.सी. टी.व्ही. कॅमेरा बसविण्यात यावे. असे आवाहन केले गेले. या उपक्रमला कल्याण पूर्वतील व्यापारी ,दुकानदार आणि ज्वेलर्स असोसिएशन अध्यक्ष प्रकाश जे शंकलेशा यांनी सांगितलं की आम्ही सर्व दुकानाच्या बाहेर सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसू असे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !  *शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाची कारवाई ची मागणी* नालासोपारा, प्रतिनिध...