Saturday, 29 January 2022

महात्मा फुले पोलीसांनी २ अवैध अग्निशस्त्रे कब्जात बाळगणाऱ्या आरोपीला केली अटक !!

महात्मा फुले पोलीसांनी २ अवैध अग्निशस्त्रे कब्जात बाळगणाऱ्या आरोपीला केली अटक !!


कल्याण, हेमंत रोकडे : पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने ठाणे ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महत्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे हद्दीत ऑल आऊट ऑपरेशनसाठी अधिकारी अंमलदार नेमुन त्यांना प्रभावी व परिणामकारक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.


त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि दिपक सरोदे व डी. बी. स्टाफ हे हद्दीत गस्त करीत असतांना सपोनि दिपक सरोदे यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, "अनंता रिजेन्सी समोर, भवानी मॅरेज हॉलचे बाजुस, काळा तलाव, कल्याण (प) येथे एक इसम पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेला आहे व त्याचे कब्जात अग्निशस्त्रे आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सपोनि दिपक सरोदे यांनी सदरची माहीती तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांना कळविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक होनमाने यांनी सदर कारवाईसाठी पोलीस अधिकारी व् अंमलदार यांची २ पथके तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन रवाना करुन सदरची माहीती तात्काळ वरिष्ठांना कळविली.


दिनांक २९/०१/२०२२ रोजी २१.०० वा. चे सुमारास पोलीस पथक हे बातमीतील नमुद ठिकाणी पोहचले असता बातमीदाराने दिलेल्या वर्णनाचा एक इसम युनिकॉर्न मोटार सायकलसह भवानी मॅरेज हॉलचे बाजुस संशयास्पद स्थितीत उभा असलेला दिसुन आला. त्याला पळण्याची कोणतीही संधी न देता पोलीस पथकाने ताब्यात घेवुन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला खोचलेला १ गावठी कट्टा तसेच १ देशी १ बनावटीचे पिस्टल, तसेच त्याचे पॅन्टीचे खिशात कट्ट्याचे ३ जिवंत काडतुसे, आणि देशी पिस्टलचे ३ जिवंत काडतुसे असे एकुण ६ काडतुसे मिळून आले आहेत. ताब्यात घेतलेल्या इसमाला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश नितुचंद राजवंशी वय २६ वर्षे, रा. माथाडी बिल्डींग, घनसोली, नवी मुंबई, मुळ राहणार जि. गुडगांव, हरीयाणा राज्य असल्याचे सांगितले आहे. सदर इसमाचे कब्जात मिळुन अग्निशस्त्रे, काडतुसे, रोख रक्कम, मोटार सायकल हे जप्त् करुन्  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला मा. न्यायालयात हजर केले असता त्याची दिनांक ३१/१/२०२२ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. तपासामध्ये सदर आरोपीने त्याचेकडील अग्निशस्त्रामधुन हवेत फायर केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात भा. ह. का. कलम २७ अशी कलमवाढ करण्यात आली आहे. सदर आरोपीचा पुर्वेतिहास पाहता त्याचे विरोधात मानपाडा  गुन्हा दाखल असुन त्यामध्ये त्याला अटक झालेली आहे. त्याच प्रमाणे त्याचे मुळ गावाकडे व इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत. याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सपोनि  सागर चव्हाण तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग दत्तात्रय कराळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ४, उल्हासनगर प्रशांत मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, जे. डी. मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग  उमेश माने-पाटील यांचा मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक 
अशोक होनमाने, पोनि. (गुन्हे) प्रदिप पाटील, सपोनि दिपक सरोदे, सपोनि ढोले, पोउनि जगताप,  व्ही. आर. भालेराव, भालेराव, एस. एम. भालेराव, भालेराव, जाधव, मधाळे, ठिकेकर, मोरे, भोईर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

कोकण रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल !

कोकण रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल ! मुंबई, प्रतिनिधी :-  उन्हाळी सुट्टीला सुरुवात होताच अनेकजण आपला परिवार किंवा मित्रमंडळासह...