Monday, 31 January 2022

ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; मात्र भिवंडी खाडी किनारी आजही हात भट्या सुरु !!

ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; मात्र भिवंडी खाडी किनारी आजही हात भट्या सुरु !!


भिवंडी, दिं,31, अरुण पाटील (कोपर) :
            राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे शाखेमार्फत गेल्या 21 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम आखण्यात आली होती. विविध ठिकाणी अवैध हातभट्टी दारू विक्री, वाहतूक यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी धाडसत्र आयोजित करण्यात आलं होतं. मात्र भिवंडी तालुक्यातील खाडी किनारी व कांदळवनात आजही हात भट्या सुरु असून त्यांच्यावर कारवाई करणे अगदी जिकरीचे असल्या कारणाने त्याचा फायदा हे हात भट्टी व्यावसायिक घेत आहेत. मात्र तरीही अशा परिस्थितीत देखील ठाणे राज्य उत्पादन शुल्क  विभाग कारवाई करत असतात. काही दिवसापूर्वी भिवंडी तालुक्यातील अंजूर -अलीमघर खाडी किनारी या पथकाने होडीतून चिखलात जाऊन हात भट्या उध्वस्त केल्याने हात भट्टी व्यवसाईकांचे धाबे चांगलेच दानाणले होते.
          या धाडसत्राच्या दरम्यान साधारणपणे 103 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये 60 गुन्हे वारस आणि 43 गुन्हे बेवारस अशा स्वरुपातील आहेत. याप्रकरणी 60 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 5 वाहनंही जप्त करण्यात आली आहेत. 50 लाख 22 हजार इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अवैध दारू विक्री आणि त्याची वाहतूक होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत नाकाबंदी केली जातेय. वाहनांची तपासणी यासह रात्रीची गस्तही घातली जात आहे.

No comments:

Post a Comment

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !  *शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाची कारवाई ची मागणी* नालासोपारा, प्रतिनिध...