Friday, 28 January 2022

महापालिकेच्या विविध प्रभागात निष्कासनाची धडक कारवाई !

महापालिकेच्या विविध प्रभागात निष्कासनाची धडक कारवाई !


कल्याण, हेमंत रोकडे : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार  आणि विभागीय उपआयुक्त  अर्चना दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली  अ प्रभागाचे सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी कल्याण पश्चिम, शहाड येथील बालाजी लॉज या इमारतीसमोर  दुकानदारांनी  मोकळया जागेमध्ये (मार्जिन स्पेस) केलेले बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई अनधिकृत बांधकाम  नियंत्रण विभागाचे  कर्मचारी  व एक जेसीबीच्या  सहाय्याने  केली.


जे प्रभागातही  विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्व, आनंदवाडी, कोळसेवाडी येथे चाळीतील चालू असलेल्या 2 रुमचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई केली.  तसेच अनिल पावशे, फुलपती फ्लॉवर मिल, रामजी यादव यांचे शेडवर कारवाई करण्यात आली त्याचप्रमाणे सुहास ढेकळे, कामत स्टोर्स यांचे चालू असलेले अनधिकृत बांधकाम निष्कसित करण्याची कारवाई अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी व हातोडयाच्या मदतीने करण्यात आली.

त्याचप्रमाणे 9/आय प्रभागातही विभागीय उपआयुक्त बाळासाहेब चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली आय प्रभागाचे  सहा. आयुक्त संजय साबळे यांनी आडीवली -ढोकळी  येथील बांधकाम धारक किरण पाटील यांचे आ.सी.सी. इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची  धडक कारवाई आज सुरु केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम  नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलिस  कर्मचारी, मानपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी  यांच्या मदतीने व 1 पोकलेनच्या सहाय्याने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

कोकण रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल !

कोकण रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल ! मुंबई, प्रतिनिधी :-  उन्हाळी सुट्टीला सुरुवात होताच अनेकजण आपला परिवार किंवा मित्रमंडळासह...