Friday 14 December 2018

कल्याणमध्ये चंपाषष्ठी उत्सव संपन्न

कल्याणमध्ये चंपाषष्ठी उत्सव जोशात संपन्न

श्री खंडेराय सेवा समितीने केले पालखीचेआयोजन

कल्याण - ( जैनेंन्द्र सैतवाल )
            येथील श्री खंडेराय सेवा समितीने सालाबादप्रमाणे यंदाही श्री खंडेरायाचा चंपाषष्ठी उत्सव गुरुवारी शारदा मंदिर हायस्कूल येथे पालखी मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषात साजरा केला.
          मार्गशीर्ष महिन्याच्या प्रारंभी मार्तंडभैरव षडरात्रोस्तव सुरू होतो. ज्या प्रमाणे देवीचा नवदिवसाचा नवरात्रोत्सव असतो तसाच श्री मार्तंड भैरवाचा सहा दिवसांचा षडरात्रोत्सव असतो. या उत्सवात अनेक लोक आपल्या घरात घटस्थापना करून सहा दिवस वेगवेगळ्या माळी घालून हा उत्सव साजरा करतात. शेवटच्या दिवशी घट विसर्जन करून ,श्री खंडोबा ची तळी भरून खंडोबाला प्रिय असणाऱ्या भरीत-भाकरीचा, पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून खातात. जे लोक घट स्थापना करीत नाहीत ते तळी आवर्जून भरतात कारण त्या दिवशी खंडोबाने मल्लासुराचा वध करून जेजुरी येथे दोन स्वयंभू लिंगे प्रगट झाली. 
           अनेक उत्सवां पैकी चंपाषष्ठी उत्सव हा गाव-खेड्यात आजही पाळला जातो. परंतु शहरी जीवनात मात्र हा कुळाचार दिवसेंदिवस नाहीसा होत चालला आहे म्हणून आधुनिक शहरी जीवनात नष्ट होत चाललेली तळीची परंपरा व प्रत्येकाला व खास करून युवकांना आपला कुळधर्म, कुळाचार करता यावा म्हणून श्री खंडेराया सेवा समितीने सामुदायिक तळी भंडार हा उपक्रम सुरू केला. असे या समितीचे अध्यक्ष एकनाथ आव्हाड व सरचिटणीस अशोक घुगे यांनी सांगितले.
           

No comments:

Post a Comment

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रभारी सचिव कानिक पाटील सेवानिवृत्त !!

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रभारी सचिव कानिक पाटील सेवानिवृत्त !! कल्याण, (एस. एल. गुडेकर) :             कल्याण कृषी उत्पन...