Friday 14 December 2018

भिवंडी - चिंबिपाडा येथे होणार गौशाळा

भिवंडी-चिंबीपाडा येथे गौशाळेचे भूमिपूजन

भिवंडी - (प्रतिनिधी)
             प्रत्येक मानवासाठी या भूतलावर घर आहे. प्राण्यांसाठी सुद्धा प्राणी संग्रहालय, घरटे आहेत. खेड्यागावांमध्ये, शेतामध्ये बैल, म्हैस यांच्या साठी गोठे असतात. पण गाईला आपण गोमाता म्हणत असल्याने गाईसाठी गोठ्या बरोबरच आपण गौशाळा बांधत असतो.
          सुसज्ज व सर्व सोयीयुक्त अशी गौशाळा बांधण्यासाठी  भिवंडी तालुक्यातील चिंबिपाडा येथे युवकांनी एकत्र येऊन श्रीराम कृष्णा गौशाला ट्रस्ट ची स्थापना केली. या ट्रस्ट च्या माध्यमातून येथील युवकांनी दोन एकर जागा घेऊन गौशाळा बांधण्याचे ठरविले. त्या जागेचे भूमिपूजन नुकतेच भिवंडी ग्रामीण चे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
         या गोशाळेत सर्व प्रकारच्या गायी आणण्याचा प्रयत्न असेल व ज्या भटक्या गायी असतील त्यांची रीतसर परवानगी घेऊन या गौशाळेत आणण्यात येतील. असे येथील गौशाळेचे संचालक ठाकूर महाराज यांनी सांगितले.
          या जागेमध्ये पाण्यासाठी बोरिंगच्या व्यवस्थेसाठी आमदार मोरे यांचे सहकार्य लाभणार असल्याचे खजिनदार भीमा राठोड यांनी सांगितले.
         भूमीपूजनाच्या कार्यक्रमास आमदार शांताराम मोरे यांच्या सह ठाणे जिल्हा परिषद च्या अध्यक्षा मंजुषा जाधव, शिवसेना तालुका प्रमुख विश्वास थळे, समाज कल्याण न्यास चे अध्यक्ष डॉ. सोन्या पाटील, जि.प.गट सचिव संदीप पाटील, उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटील, चिंबिपाडयाच्या सरपंच नीता जाधव व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
        कार्यक्रमाच्या शेवटी श्रीराम कृष्णा गौशाळेचे अध्यक्ष मनोज वेंडगे यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...