Saturday 8 December 2018

चोपडा शहरात पो.नि. पाटील यांची बदली केल्याने नागरिकांचे उपोषण

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात पो.नि.किसनराव नजन पाटील यांची बदली केल्यामुळे नागरिकांचे उपोषण

चोपडा वासीयांचा सोमवार/मंगळवारी बंद चा पुकार

                   (जळगाव - प्रतिनिधी)
जळगाव -चोपडा- (८/१२/२०१८)
         येथील पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना दि. ६ डिसेंबर रोजी भाजप पदाधिकाऱ्यांनी मारहाण करून दुखापत केली होती. परिणामी भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्याचा बदला म्हणून राज्यातील सत्तेचा उपयोग घेत भाजपने पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची बदली करवून आणली आहे. चोपड्यात राजकारण जिंकले, अधिकारी हरले अशी प्रतिक्रिया उमटत असतांना आज चोपड्यात नागरिकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ उपोषण सुरु केले आहे. पाटील यांच्यावर अन्याय झाला आहे असे मत नागरिकां कडून बोलले जात आहे. पून्हा चोपडा पो.नि. म्हणून नजन पाटील हेच हवे असी घोषणा देत आहे.
            पोलीस निरीक्षक पाटील यांचा चोपड्यातील दोन वर्षांचा कार्यकाळ सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरला आहे. अवैध धंदे तसेच गुंडगिरी मोडून काढण्याचे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले आहे. एक कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आज चोपडा शहरात नव्हते तर जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली आहे. परंतु राजकारणापुढे सर्वांचीच हार होते तशी पोलीस निरीक्षक पाटील यांच्याबाबतीत देखील घडले आहे. ज्या राजकीय मंडळीवर गुन्हे दाखल आहे अशा लोकां विरुद्ध हदपारीचा प्रस्ताव सुध्दा शासनाकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत नागरिकांनी उपोषण केले आहे.
              चोपडा वासीयांचा बंदचा पुकार
                पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने चोपडा येथील नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत. पोलिस निरीक्षक पाटील यांची बदली त्वरीत रद्द करावी, या मागणीसाठी चोपड्यातील सर्व पक्षीय कृती समितीचे असंख्य पदाधिकारी, नागरिक आज पोलिस अधिक्षक कार्यालयात आले होते. मात्र पोलिस अधिक्षकांची भेट न झाल्याने त्यांनी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची पदमालय विश्रामगृहावर भेट घेवून संतप्त भावना व्यक्त केल्या.
              आमदार पाटील यांनी भावनांचा आदर करीत लागलीच गृहराजमंत्री केसकर यांच्याशी निदेन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे ही पाटील यांनी सांगितले. बदली रद्द करण्याबाबत शिवसेना जिल्ह्यात नजन पाटील यांच्या सोबत आहे.
            चोपडा येथे मात्र सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त करीत आमदार पाटील यांना सांगितले, की जर पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची बदली रद्द न झाल्यास दि.१० /१२/२०१८ सोमवार किंवा दि.११/१२/२०१८ मंगळवार रोजी चोपडा शहरात सर्वत्र कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध करू. काही अनूचीत प्रकार घडल्यास त्यास शासन जबाबदार राहिल, असा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...