रामनगर सज्जनगड - सिद्धार्थ सोसायटी येथील नाल्यावरील जीर्ण झालेला पूल धोकादायक स्थितीत ; स्थानिक नागरिकांचा जीवमुठीत घेऊन प्रवास !!
घाटकोपर, (केतन भोज) : रामनगर ब प्रभाग क्रमांक १२३ मधील सज्जनगड सोसायटी - सिद्धार्थ सोसायटी येथील मुख्य मोठ्या नाल्यावरील स्थानिक रहिवाशांकरिता असलेला नाल्यावरील पूल धोकादायक स्थितीत झाला असून या नाल्याच्या मुख्य बांधकामाला आणि नाल्यावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे.तर नाल्याचा काही भाग हा खचला आहे त्यामुळे तो आता पावसाळ्यात कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.परिणामी येथील स्थानिक सोसायट्यांना जोडणाऱ्या या नाल्यावरील मुख्य पूलावरून स्थानिक नागरिक आपला जीव मुठीत घेऊन रोज येजा करत आहेत.
तसेच या धोकादायक ठरत असलेल्या नाल्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना तसेच लहान मुलांना देखील आपला जीव मुठीत घेऊन याठिकाणी राहावे लागत आहे.परिणामी याठिकाणी आता धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून हा पूल आता कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच येथील स्थानिक नागरिकांसाठी हा पूल येण्या - जाण्याचा हा एकमेव मार्ग असल्यामुळे जर हा धोकादायक पूल कोसळ्यास स्थानिकांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद होऊ शकतो.तरी या समस्येकडे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे,असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.या मुख्य नाल्यावरील पुलाच्या दुरुस्तीसाठी किंवा पुनर्बांधणीसाठी पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मनपा प्रशासनाच्या विरुद्ध नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.तरी सज्जनगड - सिध्दार्थ सोसायटी येथील मुख्य नाल्यावरील जीर्ण पुलाच्या या समस्येकडे संबंधित मनपा पालिका प्रशासनाने दुर्लक्ष करणे अत्यंत गंभीर आहे.मनपा प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करणे आवश्यक असून, जेणेकरून स्थानिक नागरिकांची गैरसोय दूर होईल आणि कोणतीही दुर्घटना होणार नाही याची हमी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment