नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर शिवसेनेने घेतली हरकत !!
** नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचना नव्याने करण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी
उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अ कोकण विभागीय पुरवणी क्रमांक RNI NO. MAHBIL/२००९/३५५७४, दिनांक १४/०७/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर आदेशानुसार उरण पंचायत समिती येथे झालेल्या बैठकीमध्ये नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचना नव्याने करण्यात यावी, त्यामध्ये २०१७ च्या निवडणुकी पूर्वी नवघर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सोनारी, करळ, सावरखार अशी तीन गावे आताच्या प्रभाग रचनेत वगळण्यात आलेली आहेत. ती पुन्हा एकदा नवघर जिल्हा परिषदेमध्ये घेण्यात यावी.त्याचबरोबर काळा धोंडा हे चाणजे ग्रामपंचयातीमध्ये समाविष्ठ असल्यामुळे तो भाग चाणजे जिल्हा परिषद प्रभागात घेण्यात यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे पत्रव्यवहारद्वारे केली आहे.भारतीय लोकसंख्येची जनगणना मागील बारा वर्षे झाली नसल्याकारणाने उरण मतदार संघातील जिल्हा परिषद प्रभाग रचनेमध्ये लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. तरी नवघर जिल्हा परिषदेत पारंपारिक असलेले प्रभागातील गावे न वगळता नव्याने २०१७ च्या निवडणुकीत अगोदर असलेले प्रभाग रचना तसेच ठेवण्यात यावी अशी मागणी तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून व हरकत घेऊन जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment