Saturday 27 January 2024

म्हसा ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय, यात्रेचे पास, तिकीट, आयकार्ड न देण्याचा ठराव, लोक कलावंत व व्यापाऱ्यांमध्ये समाधान !

म्हसा ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय, यात्रेचे पास, तिकीट, आयकार्ड न देण्याचा ठराव, लोक कलावंत व व्यापाऱ्यांमध्ये समाधान !

कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध' म्हसा, यात्रेत येणाऱ्या लोकनाट्य व इतर मनोरंजन करणाऱ्या तमाशा व तस्सम प्रकारच्या कार्यक्रमासाठी कोणालाही मोफत पास, तिकीट, अथवा आयकार्ड न देण्याचा ऐतिहासिक निर्णय म्हसा ग्रामपंचायतीने घेतला असून तसा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या या मंडळींनी समाधान व्यक्त केले आहे तर "फुकट्या, यात्रेकरुनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील म्हसा ही यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे, महाराष्ट्रासह आजुबाजुच्या राज्यातून ही व्यापारी, कलावंत, येते येत असतात, तब्बल १५/२० दिवस चालणाऱ्या या यात्रेत २०लाखांच्या आसपास लोक येतात, घोंगडी, शेतीचे साहित्य, संसार उपयोगी साहित्य, बैलजोडी यासाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. याबरोबरच लोकनाट्य तमाशा, मौत का कुवा, अथवा इतर मनोरंजन कार्यक्रम, खेळणी, पाळणे असेही या ठिकाणी येतात. मात्र अनेक लोक' अमुक तमूकचे नाव सांगून मोफत पास घेतात, येवढ्या वरच न थांबता ते अजून आपल्या मित्रमंडळी व नातेवाईक यांनाही पास, तिकीट, आयकार्ड घेऊन जातात. यामुळे या कलाकारांचे मोठे आर्थिक नुकसान होते. तसे त्यांनी अनेक वेळी ग्रामपंचायत व प्रशासनाला बोलून दाखवले होते.

मागील काही अनुभव पाहता ४/५ हजार पास, तिकीट, आयकार्ड घेऊन गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे यावर्षी आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत म्हसा यात्रेत कोणालाही पास 'तिकीट, अथवा आयकार्ड द्यायचे नाही असा निर्णय घेण्यात आला, तसा ठराव घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतीस देण्यात आल्या.

म्हसा ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर ग्रामविकास अधिकारी शिवाजी टोहके आणि प्रभारी सरपंच दिनेश कुर्ले यांनी ताबडतोब सदस्यांची बैठक बोलावून विषय क्रमांक १८/१ आणि ठराव क्र १८/१ नुसार पास न देण्याचा विषय मांडला याबाबतची सूचना सदस्यां जया प्रविण घागस, लता नंदकुमार ढमणे, माधुरी सारथी गायकर, आणि वाराबाई काळुराम वाघ यांनी मांडली तर याला अनुमोदन विठ्ठल जानू कुर्ले,व रमेश गोविंद कुर्ले यांनी देऊन हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. एवढ्यावरच ग्रामपंचायत न थांबता याचे बँनर बनवून ते यात्रेत जागोजागी लावून अंमलबजावणी केली, त्यामुळे व्यापारी, दूकानदार, स्टाँलधारक, खेळणी, पाळणे, लोकनाट्य मंडळी यांनी समाधान व्यक्त केले तसेच ग्रामपंचायतीचे आभार मानले तर यामुळे' फुकट्या, यात्रेकरुचे 'बारा, वाजले, हे सर्व आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, लोकप्रतिनिधी, म्हसा ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच दिनेश कुर्ले व सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने केले असे म्हसा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी टोहके यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...