Monday 29 January 2024

वसत शेलवली ग्रामपंचायतीच्या वतीने ख-या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा, पहिली ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थीचा शैक्षणिक खर्च उचलला, तर शाळेला इंटरनेट सेवेचे पँकेज !

वसत शेलवली ग्रामपंचायतीच्या वतीने ख-या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा, पहिली ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थीचा शैक्षणिक खर्च उचलला, तर शाळेला इंटरनेट सेवेचे पँकेज !

कल्याण, (संजय कांबळे) : लोकशाही म्हणजे, लोकांनी लोकासाठी चालवलेली यंत्रणा, असे ढोबळ मानाने म्हटले जाते, याचे तंतोतंत उदाहरण व अंमलबजावणी कल्याण तालुक्यातील वसत शेलवली ग्रामपंचायतीचे सरपंच रवी भोईर यांनी केली असून' तान्वेश भोईर,फांऊंडेशन च्या वतीने २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गावातील आदिवासी समाजातील गरीब मुलांचे इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतचे शिक्षण, त्याचा खर्च करण्यात येणार असून इतकेच नव्हे तर जिल्हा परिषद शाळेला इंटरनेट पँकेज वर्षभरासाठी पुरविण्यात येणार आहे, त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर वसत शेलवली हे गाव वसले आहे, या गावचे सरपंच रवी भोईर हे सतत वेगळेपण जपण्यासाठी आग्रही असतात, आपली सरपंच पदी निवड होताच, या पदाचे सर्व मानधन गाव व परिसरातील गोरगरीब कुंटूब व मुलांना दिले होते, त्यांना आदर्श सरपंच हा पुरस्कार ही मिळाला आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्विकारले व २६ जानेवारी १९५० पासून ते अंमलात आले. तेव्हा पासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून वसत शेलवली ग्रामपंचायतीचे सरपंच रवी भोईर यांनी अतिशय चांगला संकल्प केला. तान्वेष भोईर, फांऊंडेशन च्या वतीने गावातील आदिवासी वस्तीमधील हुशार ५ मुलांचे त्यांचे इयत्ता १ते पदवी (बीए) पर्यंत चे शिक्षण, त्यांचा सर्व खर्च करण्याचा निर्णय घेतला, इतकेच नव्हे तर देशाचे भावी नागरिक घडविणा-या १ ते ७वी जिल्हा परिषद शाळेला वर्षभर इंटरनेट पँकेज देण्यात येणार आहे, प्रत्येक वेळी ६ हजार रुपयेचा रिचार्ज ते करणार आहेत, १०४ विद्यार्थी असलेल्या या शाळेत संतोष मिडगे, मुख्याध्यापक, उमादेवी पाटील, दिप्ती गांगुर्डे हे शिक्षक ज्ञान देण्याचे काम करतात.
या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास सुरेश भोईर, भाजपा, उपाध्यक्ष, ठाणे ग्रामीण, सरपंच रवी भोईर, उपसरपंच, रुपेश जाधव, सदस्य जयश्री मार्के, उषा हरणे, जिजाबाई भोईर, भास्कर भोईर, विजय गोरे, ग्रामसेविका, पूनम गगे, जेष्ठ नागरिक मनोहर गोरे, हनुमान भोईर, माजी सदस्य लक्ष्मण मुकणे, सोमनाथ जाधव, आदी मंडळी उपस्थित होते, यावेळी सरपंच रवी भोईर यांना विचारले असता ते म्हणाले, आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे लोकोपयोगी निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे. तर अनेकाकडून सरपंच रवी भोईर यांचे अभिनंदन ही केले जाते आहे तसेच असेच अनुकरण इतर सरपंच व सदस्यांनी केले तर ख-या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा होईल अशी प्रतिक्रिया अँड सुनील गायकर यांनी व्यक्त केली..

No comments:

Post a Comment

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांची अवहेलना !! पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील प्रत्येक घडामोडींचे...