Wednesday 31 January 2024

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांची एम. एस. आर. डिसीच्या मँनेजिंग डायरेक्टरपदी बदली !

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांची एम. एस. आर. डिसीच्या मँनेजिंग डायरेक्टरपदी बदली !

कल्याण, (संजय कांबळे) : आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात ठाणे जिल्हा परिषदेत आपल्या कार्य कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविणारे २०१७ बॅचचे आईएएस अधिकारी मनूज जिंदल यांची एम. एस. आर. डिसीच्या जॉइंट मँनेजिंग डायरेक्टर पदी बदली झाली आहे. एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख निर्माण झाली होती.

महाराष्ट्रात ठाणे जिल्हा हा २ नंबरचा मानला जातो, या जिल्ह्याचे शहरी व ग्रामीण असे दोन भाग पडतात, या जिल्ह्यात एक वर्षांपूर्वी मनूज जिंदल यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली, २०१७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी युपीएससी एनडीए परीक्षेत आँल इंडिया मधून १८ व्या रँकने उर्तीण झालेले या अधिकां-यानी पदभार स्विकारताच मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात केली, शहापूर, मुरबाड, या मागास तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केले, कुपोषण, पाणी पुरवठा, घरकुल योजना आदी बाबतीत स्वतः जातीने पाठपुरावा केला.स्वच्छता अभियान, जलजीवन मिशन, मोदी आवास, सर्वे इत्यादी मध्ये ते नेहमी अग्रेसर राहिले, कातकरी वाडी, आदीवासी वस्ती, मध्ये भेटी देऊन अडचणी समजून त्या दूर केल्या, इतकेच नव्हे तर कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायत हद्दीतील कातकरी वाडी येथील ३/२ चा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी अतोनात मेहनत घेतली व अखेरीस मंजुरी मिळाली.

अतिवृष्टी व पुर परिस्थितीत प्रत्येक पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांना यंत्रणेसह उपस्थित राह्याला सांगून शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहचते की नाही यावर लक्ष ठेवले व मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर जबरदस्त वचक व तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ दिला. कोणत्याही शासकीय योजना अथवा अभिमान राबविण्यात ठाणे जिल्हा राज्यात नेहमी अग्रेसर राहिला. यातून त्यांची कार्य तत्परता व कर्तव्यनिष्ठता दिसून आली.

अशा या चांगल्या अधिका-याची अचानक एम. एस‌ आर. डिसीच्या जॉइंट मँनेजिंग डायरेक्टर पदी बदली झाली आहे. त्यांना अजून काही वर्षे कालावधी मिळाला असता तर त्यांनी ठाणे जिल्हा यशाच्या उंच शिखरावर पोहचला असता, परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यांच्या बदलीमुळे एका चांगल्या आईएएस अधिकां-याची पोखळी भरून निघेल का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

*प्रतिक्रिया __

मा‌. श्री. मनूज जिंदल (माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद) -
ही बदली मला अनपेक्षित आहे, पण शासनाच्या मर्जीपुढे काय? त्यांनी मला एम एस आरडिसीचे काम करण्याची संधी दिली आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...