कल्याण, सचिन बुटाला : कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांनी अनेक विकासकामे राज्य व महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली आहेत.
आज गुरुवारी शासनाच्या विशेष निधीतून अनेक विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले, शाळेला संरक्षक भिंत, नवीन शौचालय उभारणी, सांस्कृतिक सभागृह, रस्ते कॉंक्रिटीकरण, गटारे, अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले.
यावेळी आमदार गणपत गायकवाड, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला मोर्चा अध्यक्षा सविता देशमुख, जेष्ठ कार्यकर्त्या वंदना मोरे तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment