Monday 29 January 2024

कल्याण येथे एस.सी.एच.आय तर्फे ८ ते ११ फेब्रुवारी रोजी प्रॉपर्टी प्रदर्शन !!

कल्याण येथे एस.सी.एच.आय तर्फे ८ ते ११ फेब्रुवारी रोजी प्रॉपर्टी प्रदर्शन !!

कल्याण, सचिन बुटाला : सर्व सामान्य माणसाला आज मुंबईत घर घेणं जवळपास अशक्य झाले आहे. अशावेळी लोकांचा कल कल्याण डोंबिवली शहराकडे वाढला आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून सर्वसाधारण लोकांना परवडतील अशी रेरा रजिस्टर घरांचे बांधकाम एस.सी.एच.आयने करण्याचे निश्चित केले असून त्याचे बरोबर मुंबईप्रमाणेच अत्याधुनिक सोयीसुविधा व प्रशस्त घरांची निर्मिती सुध्दा केली आहे. या सर्व प्रकल्पाची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी दरवर्षी एस.सी.एच.आय. कल्याण डोंबिवली युनिटच्या तर्फे कल्याणामध्ये प्रॉपर्टी प्रदर्शन भरविते. असे दर्जेदार १३ वे प्रदर्शन ८ ते ११ फेब्रुवारी आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष भरत छेडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पत्रकार परिषदेत अध्यक्ष भरत छेडा, सचिव अरविंद वरक, एक्झीबिशन कमिटी सचिव सुनिल चव्हाण, प्रमुख सल्लागार तथा माजी अध्यक्ष रवि पाटील आदि उपस्थित होते

यावेळी अध्यक्ष छेडा म्हणाले, या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर ते ठाणे, शिळफाटा रोड परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे बघण्याची संधी कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आहे.१६ लाखापासून सुरू होणारी आणि १ करोड पर्यंत घरे प्रदर्शनात उपलब्ध असणार आहे. तर माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी सांगितले की, सर्वसामान्यांना परवडतील अशी मनपसंत घरे देण्याचा प्रयत्न क्रेडाई एस.सी.एच.आय. कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. या प्रदर्शनात ४० हुन अधिक विकासकांचे १५० हुन अधिक प्रोजेक्ट सादर करणार आहेत. दरवर्षी या प्रदर्शनाला २५ हजारहून अधिक नागरीक भेट देतात. यावेळी रवी पाटील यांनी सांगितले वाढत्या लोकसंख्येकरता स्वतंत्र धरणासाठी एस.सी.एच.आयकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक विचार करून होकार दिला आहे. 

या प्रदर्शनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर आणि पालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड व सुप्रसिध्द अभिनेत्री शमिता शेट्टी उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...