Friday 26 January 2024

समेळगावातुन महिलांनी हजारो मराठा बांधवांसाठी पाठवली शिदोरी....

समेळगावातुन महिलांनी हजारो मराठा बांधवांसाठी पाठवली शिदोरी....

*समेळगावातील महिलांनी एकत्र येत जपली सामाजिक बांधिलकी.* 

नालासोपारा, प्रतिनिधी : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील लाखो बांधवासोबत मुंबईला आरक्षणाच्या मागणीसाठी पायी चालत निघाले आहेत. त्यांच्या या कार्यास सहभागी होण्यासाठी शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी समेळगावातील महिलांना आव्हाहन केले होते.

समेळगावातील सर्व जाती धर्मातील महिला एकत्र येत मराठा आरक्षणासाठी पायी येत असलेल्या बांधवांसाठी १ हजार चपाती व 5 किलो चटणी, बिस्कीट पुडे, बिस्लरी, फरसाण, व इतर पदार्थ मुंबई येथे पाठवले आहे.

समाजासाठी सगळे मतभेद विसरुन समेळगावातील महिला एकत्र येत आपापल्या घरातुन लागणारे साहित्य जमा केले आहे. महिलांचा एकोपा व एकी हेच बळ हे यातुन दिसुन आले आहे. शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी महिलांसाठी विविध उपक्रम राबवून महिलांना एकत्र आणण्याचे काम केले आहे.

मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता शिक्षण नोकरी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भावना रूचिता नाईक यांनी व्यक्त केली. यावेळी सविता चव्हाण, आशा सातपुते, इंदू गुप्ता, मौसमी कुन्नत, प्रिति माने, सुषमा काकडे, शालिनी सनंसे, काव्य खामकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...