Friday 26 January 2024

चाळीस वर्षे एकनिष्ठ, पक्षनिष्ठ राहिलेल्या गुरवली गावच्या जयराम मेहेर यांची मुरबाड विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती, अभिनंदनाचा वर्षाव !

चाळीस वर्षे एकनिष्ठ, पक्षनिष्ठ राहिलेल्या गुरवली गावच्या जयराम मेहेर यांची मुरबाड विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती, अभिनंदनाचा वर्षाव !

कल्याण, (संजय कांबळे) : सध्या राजकारणाचा चिखल झालेला असताना या चिखलात अनेक जण 'बेडूक, उड्या मारत आहेत अशाही परिस्थितीत गेली, ४० वर्षाहून अधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर अढळ विश्वास ठेवून काम करणारे पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते, ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माझी सदस्य आणि गुरवली ग्रामपंचायतीचे अनेक वेळा सरपंच पद भूषविलेले जयराम पांडुरंग मेहेर यांची मुरबाड विधानसभेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे पक्षातील पदाधिकाऱ्यांसह इतरांनी देखील अभिनंदन केले आहे.

कल्याण तालुक्यातील आणि टिटवाळा शहरानजीक काळु नदीच्या काठावर वसलेल्या गुरवली गावचे जयराम पांडुरंग मेहेर हे १९७२ पासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येत आहेत, नवीन व स्वतः ला पुरेसे ज्ञान नसल्याने त्यांनी स्वतः चे सरपंच पद 'जोशी, नामक इतर सदस्यांला दिले व ते उपसरपंच झाले, यानंतर मात्र २००५ पर्यत ते २ वेळा सरपंच झाले,
ख-या अर्थाने मुरबाड चे कार्यसम्राट आमदार गोटिराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांचा प्रभाव असलेले मेहेर हे २००२ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सदस्य झाले, या संधीचा फायदा उचलत निंबवली, वासुर्दी, गुरवली, राया, सांगोडा, नांदप, खडवली, घोटसई, आदी गावामध्ये शाळा इमारती तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी बांधल्या, याशिवाय घोटसई, गुरवली, मानिवली, भोंगाळपाडा, गुरवली इत्यादी गावातील अंतर्गत रस्ते बनवून घेतले. सन १९८४ पासून ते आतापर्यंत जयराम मेहेर हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले, या काळात अजित पवारासह अनेक आमदार, पदाधिकारी शरद पवार यांना सोडून गेले, वैयक्तिक स्वार्थ, इडी, इनकम टँक्स, सीबीआय आदी यंत्रणांना घाबरून शिवसेनेसह सर्वच पक्षातील आमदार, खासदार यांनी, अपक्षासह इकडून तिकडे बेडूक उड्या मारल्या व भविष्यात मारतील, मात्र याला स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते बळी पडले नाहीत, लोकप्रतिनिधी इकडून तिकडे गेले असलेतरी सर्व सामान्य जनता, मतदार हा शरद पवार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांच्या मागे आहेत, तसे ते बोलूनही दाखवतात, याचाच प्रत्यय ४० वर्षाहून अधिक काळ एकनिष्ठ पक्षनिष्ठ राहिलेल्या जयराम मेहेर यांची मुरबाड विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे

शांत, संयमी, मितभाषी, जनमानसात चांगली प्रतिमा असलेले, जेष्ठ, तसेच अभ्यासू, तळागाळातील लोकाबरोबर काम करणारा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले जयराम मेहेर यांच्या निवडीने त्यांच्या एकनिष्ठतेचा पक्षाने सन्मान केला आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष, काशिनाथ पाटील, प्रदेश उपाध्यक्ष श्री पवार, कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष वंडारशेठ पाटील, पालघर ठाणे प्रभारी विद्याताई वेंखडे, शहापूर चे मनोज विशे, मुरबाड चे दिपक वाकचौरे, अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष भरत गोंधळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सोमनाथ मिरकुटे, उबाठा चे विश्वनाथ जाधव, अल्पेश भोईर, संजय मोरे,संतोष शेलार, ज्ञानेश्वर पाटील, विनायक काळण, संतोष कुशविले,संतोष कोर, यांच्या सह पत्रकार संजय कांबळे, विलास भोईर, सचिन बुटाला, आदी नी मेहेर यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांची अवहेलना !! पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील प्रत्येक घडामोडींचे...