Thursday, 26 March 2026

वालधुनी नदी संदर्भात धक्कादायक माहिती उघडकीस !!

वालधुनी नदी संदर्भात धक्कादायक माहिती उघडकीस !!

माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उप-प्रादेशिक कार्यालय कल्याण यांच्या वालधुनी नदी संदर्भात गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत.

वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील सिताराम उतेकर यांनी माहिती अधिकाराद्वारे मागील पाच वर्षांतील नोंदी मागविल्या असता खालील बाबी समोर आल्या मागील पाच वर्षांत वालधुनी नदी संदर्भात सामाजिक व राजकीय लोकप्रतिनिधींकडून अत्यल्प पत्रव्यवहार झाला आहे. उपलब्ध नोंदीनुसार केवळ श्री. सुनील उतेकर व श्री. निशांत कांबळे यांचीच दोन पत्रे आढळून आली.
*महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शासनाकडे वालधुनी नदी संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केलेला नसल्याचे (निरंक) कळविण्यात आले.
वालधुनी नदी स्वच्छतेसाठी कोणताही निधी उपलब्ध झालेला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

नदीसाठी स्वतंत्र अकाउंट हेड किंवा खर्चासाठी खाते उघडण्यात आलेले नाही, असेही सांगण्यात आले. वरील सर्व बाबींमुळे संबंधित विभागाची निष्क्रियता स्पष्ट होत असून, हा अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी केवळ कार्यालयात बसून कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेकडून करण्यात आला आहे. तसेच वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था लवकरच या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील सिताराम उतेकर यांनी दिली आहे. 

वृत्त - कल्याण (प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment

गोरेगाव येथे नवरात्री अष्टमी निमित्त विशेष ललिता सहस्त्रनाम कुंकूमार्चन सेवा संपन्न !!

गोरेगाव येथे नवरात्री अष्टमी निमित्त विशेष ललिता सहस्त्रनाम कुंकूमार्चन सेवा संपन्न !! मुंबई, पी. डी. पाटील : नागरी निवारा परिषद...