Wednesday, 2 September 2026

वर्तक महाविद्यालयात ‘विकसित भारत @2047’ आंतरराष्ट्रीय ई-परिषद उत्साहात !!

वर्तक महाविद्यालयात ‘विकसित भारत @2047’ आंतरराष्ट्रीय ई-परिषद उत्साहात !!

कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल अर्थव्यवस्था, नवोन्मेष आणि शाश्वत विकासावर देश-विदेशातील तज्ज्ञांचे विचारमंथन

वसई प्रतिनिधी/ पंकज चव्हाण.

वसईतील विद्यावर्धिनीच्या अण्णासाहेब वर्तक कला महाविद्यालय, केदारनाथ मल्होत्रा वाणिज्य महाविद्यालय आणि ई. एस. अंड्राडिस विज्ञान महाविद्यालय यांच्या वतीने ‘Viksit Bharat @2047: Empowering India’s Digital Future through Artificial Intelligence, Digital Economy, Commerce, Innovation, and Sustainable Development’ या विषयावर एकदिवसीय बहुविषयक आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन करण्यात आले. लेखाशास्त्र व अर्थशास्त्र विभागाने IQAC च्या सहकार्याने आणि Global Foundationच्या सहयोगाने ही परिषद आयोजित केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, डिजिटल अर्थव्यवस्था, वाणिज्य, नवोन्मेष, फिनटेक, उद्योजकता, गिग इकॉनॉमी आणि शाश्वत विकास अशा समकालीन विषयांवर देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी या परिषदेत विचारमंथन केले. संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी देणे, हा परिषदेचा प्रमुख उद्देश होता.

उद्घाटन सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य व परिषदेचे संचालक डॉ. अरविंद वा. उबाळे यांनी स्वागत केले. परिषदेच्या समन्वयक प्रा. वंदना केडिया यांनी प्रास्ताविकातून परिषदेची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली. संस्थेचे अध्यक्ष श्री. विकास वर्तक यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले.

अमेरिकेतील Salisbury Universityचे Visiting Professor डॉ. प्रवीण जी. सप्तर्षी यांनी बीजभाषणातून विकसित भारताच्या डिजिटल भविष्यासाठी तंत्रज्ञान, ज्ञान आणि नवोन्मेषाचे महत्त्व अधोरेखित केले. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. सोमनाथ विभुते, प्राचार्य, जी. जी. कॉलेज, वसई यांनी भूषविले.
परिषदेत पाच प्रमुख तज्ज्ञ सत्रांचे आयोजन करण्यात आले. प्रा. (डॉ.) मदन मोहन गोयल, कुलगुरू व निवृत्त प्राध्यापक, अर्थशास्त्र, कुरुक्षेत्र विद्यापीठ; डॉ. मुन्थेर मोहद इब्राहिम झ्युद, प्राध्यापक, Al-Quds Open University, Palestinian Territory; डॉ. जावेद आलम, माजी सहयोगी प्राध्यापक, Department of Psychology, College of Behavioral Sciences, Addis Ababa University, Ethiopia; प्रा. (डॉ.) एफ. एम. नदाफ, प्राचार्य, Government Government College, Borda Margao, Goa; तसेच डॉ. ज्योतिराम सी. मोरे, प्राध्यापक व भूगोल विभागप्रमुख, Bharatiya Jain Sanghatana’s Arts, Science and Commerce College यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

या पाच तज्ज्ञ सत्रांचे अध्यक्षस्थान अनुक्रमे डॉ. विष्णू यादव, डॉ. विकास उबाळे, डॉ. कुलदीप सिंह राठोड, डॉ. अनिलकुमार शेळके आणि डॉ. हिरानंद खांबायत यांनी भूषविले. दुपारच्या सत्रात तीन तांत्रिक सत्रांमध्ये संशोधन निबंधांचे सादरीकरण करण्यात आले. या सत्रांचे अध्यक्षस्थान अनुक्रमे डॉ. विजयानंद बनसोडे, डॉ. भीमराव होनपारखे आणि डॉ. मनीष तिरपुडे यांनी भूषविले. विविध राज्यांतील संशोधक व विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्थिक समावेशन, डिजिटल प्रशासन, ग्रामीण रोजगार, डिजिटल फायनान्स, डिजिटल अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकास यांसारख्या विषयांवरील संशोधनपर निबंध सादर केले. एकंदर २६४ अभ्यासकांनी या परिषदेत आपला सहभाग नोंदवला

परिषदेचे संचालक प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, समन्वयक प्रा. वंदना केडिया आणि सहसमन्वयक व अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. विनायक निकस यांनी आयोजन समितीतील सदस्यांच्या सहकार्याने परिषद यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

या आंतरराष्ट्रीय ई-परिषदेच्या माध्यमातून शिक्षण, संशोधन, उद्योग, तंत्रज्ञान आणि धोरणनिर्मिती यांच्यातील परस्परसंबंध अधिक दृढ करण्याचा, तसेच ज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून ‘विकसित भारत @2047’ या संकल्पनेला व्यापक बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

No comments:

Post a Comment

वर्तक महाविद्यालयात ‘विकसित भारत @2047’ आंतरराष्ट्रीय ई-परिषद उत्साहात !!

वर्तक महाविद्यालयात ‘विकसित भारत @2047’ आंतरराष्ट्रीय ई-परिषद उत्साहात !! कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल अर्थव्यवस्था, नवोन्मेष आणि शाश्वत विका...