Wednesday, 2 September 2026

कल्याणमध्ये गणेशोत्सव-२०२६ च्या पार्श्वभूमीवर समन्वय बैठक संपन्न !!

कल्याणमध्ये गणेशोत्सव-२०२६ च्या पार्श्वभूमीवर समन्वय बैठक संपन्न !!

*कल्याण, प्रतिनिधी 

बुधवार दि. ०२/०९/२०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पोलीस उपायुक्त, परिमंडळ ३, कल्याण आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव-२०२६ साठी एक महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश मूर्तीच्या पूजनाने झाली. यानंतर उपस्थितांना _सायबर अवेअरनेस बाबत माहिती तसेच ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम_ या विषयावरील लघुपट दाखवण्यात आला. तसेच, KDMC द्वारे सुरू करण्यात आलेल्या _'एक खिडकी योजना'_ या सॉफ्टवेअरची माहिती पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन (PPT) द्वारे देण्यात आली.

पोलीस उपायुक्त, परिमंडळ ३, कल्याण श्री. अतुल झेंडे यांनी प्रास्ताविक भाषण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण श्री. संजय जाधव आणि आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका श्री. अभिनव गोयल हे उपस्थित होते.

या बैठकीत गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात प्रशासकीय नियम, गणेश मंडळांच्या अडचणी, सुरक्षा व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. उपस्थितांनी मांडलेल्या समस्यांवर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पूर्तता करण्याबाबत आश्वासन दिले.

या बैठकीस सुमारे ५५० ते ६०० नागरिक उपस्थित होते, ज्यात गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस मित्र, शांतता मोहल्ला समिती आणि महिला दक्षता समितीचे सदस्य यांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

वर्तक महाविद्यालयात ‘विकसित भारत @2047’ आंतरराष्ट्रीय ई-परिषद उत्साहात !!

वर्तक महाविद्यालयात ‘विकसित भारत @2047’ आंतरराष्ट्रीय ई-परिषद उत्साहात !! कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल अर्थव्यवस्था, नवोन्मेष आणि शाश्वत विका...