Friday, 27 March 2026

प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच !

प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच !

कल्याण, प्रतिनिधी :

मोहन पॅराडाईज फेज-२, वायले नगर येथील रहिवाशांना मागील अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या गंभीर समस्येबाबत सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्री. सुरेश आंबेकर यांनी महानगरपालिका तसेच पाणीपुरवठा कार्यकारी विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. स्थानिक नगरसेवकांकडेही याबाबत निवेदन देण्यात आले होते, मात्र अद्याप समाधानकारक तोडगा निघाला नव्हता.

या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिकेत जाऊन प्रभाग ५ चे शिवसेनेचे नगरसेवक रुपेश केरू सकपाळ, डॉ. तनुजा अनिकेत वायले, किरण राजाराम भांगले तसेच सौं. प्रमिला भगवान पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. अभिनय गोयल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर पाणीप्रश्नावर तातडीने तोडगा काढत या समस्येचे तातडीने निराकरण करावे अशी ठाम मागणी केली.

नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत आणि योग्य पद्धतीने मिळाव्यात, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रभागातील नागरिकांची कोणतीही तक्रार किंवा समस्या असेल तर त्या संदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्या समस्यांचा पाठपुरावा करत त्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे यांनी (प्रभाग ५ चे नगरसेवक) यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

गोरेगाव येथे नवरात्री अष्टमी निमित्त विशेष ललिता सहस्त्रनाम कुंकूमार्चन सेवा संपन्न !!

गोरेगाव येथे नवरात्री अष्टमी निमित्त विशेष ललिता सहस्त्रनाम कुंकूमार्चन सेवा संपन्न !! मुंबई, पी. डी. पाटील : नागरी निवारा परिषद...