Saturday, 18 July 2026

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !!

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !!

पनवेल येथील सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या वाणिज्य विभागामार्फत गुरुवार, दि.१६ जुलै २०२६ रोजी नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी ठिक ११.०० वाजता करण्यात आले होते.
 
नवीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची व महाविद्यालयाच्या धेय्य व उद्दिष्टांची ओळख करून देणे आणि त्यांचे स्वागत करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत करून झाली. त्यानंतर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सामुदायिकरित्या सुंदर स्वागतगीत सादर करून वातावरणात प्रसन्न केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत के. बेहेरा यांनी आपल्या भाषणात नवीन विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उत्कृष्टतेसोबतच शिस्त, नैतिक मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. पंकज सरवदे यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना विभागाची रचना, अभ्यासक्रम, महाविद्यालयातील सुविधा, परीक्षा पद्धती तसेच भविष्यातील करिअरच्या संधी याबद्दल सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी वाणिज्य विभागातील प्राध्यापक प्रशांत दळवी, साक्षी क्षीरसागर, मनप्रीत कौर, निलेश पवार, चंद्रकांत मोहिते, रोशनी सिंग, डॉ. शाश्वत गुप्ता, हिमांशू अग्रवाल आणि नंदिनी पाटील यांनी स्वतःचा परिचय करून देत आपल्या विषयांची व जबाबदाऱ्यांची माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या प्राध्यापक व विभागाशी परिचित होण्यास मदत झाली.

हा स्वागत समारंभ अत्यंत माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरला. या कार्यक्रमामुळे नवीन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला तसेच महाविद्यालयाबद्दल आपुलकीची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाच्या शेवटी कॉलेज मॅनेजमेंट (संस्था चालक), प्राचार्य, विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, द्वितीय वर्षाचे विद्यार्थी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

*प्रा. पंकज सरवदे*
(वाणिज्य विभाग प्रमुख)

No comments:

Post a Comment

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !!

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !! पनवेल येथील सेंट व...