आरपीआय दक्षिण मध्य मुंबईतर्फे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार सोहळा संपन्न !!
धर्मगुरू भन्ते राहुल बोधी यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांच्या माध्यमातून रविवार दिनांक २९ मार्च रोजी चेंबूर येथील फाईन आर्ट मध्ये भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या सोहळ्यात धर्मगुरू भन्ते राहुल बोधी यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आरपीआय चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, महाराष्ट्र सरचिटणीस गौतम सोनावणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, सुरेश बारसिंगे, शीला ताई गांगुर्डे, अनिल गांगुर्डे, बालासाहेब गरुड़, पूर्व नगर सेविका फूलाबाई सोनावणे, अनिस पठाण, महायुतीचे पदाधिकारी भाजपा जिल्हा अध्यक्ष नीरज उभारे प्रभाग समिति अध्यक्ष आशा सुभाष मराठे, नगरसेवक महादेव शिवगन, शिवसेना नगरसेविका समृद्धि काते, समाजसेवक सुभाष मराठे, जयप्रकाश अग्रवाल आदिसह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला पुरुष युवा कार्यकर्ते भीमसैनिक उपस्थित होते.
सत्येचा सहभाग मला एकट्याला नको तर माझ्या कार्यकर्त्याला ही पाहिजे - रामदास आठवले
या सत्कार कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना सत्कार मूर्ती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले कि सत्येचा सहभाग मला एकट्याला नको तर माझ्या कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे अशी माजी भूमिका असते मात्र आपण निवडणुकीत कमी पडतो म्हणून राहून जाते. माझ्या भीमाच्या लोकशक्ती मुळे आज मी तिसऱ्यांदा राज्यसभा खासदार आणि मंत्री झालो. माझ्या भीमामुळे माझ्या कामाला येत आहे आकार म्हणून चेंबूर मध्ये माझा होत आहे भव्य सत्कार, राजकारणात न मागता जे मिलते त्याला महत्व आहे देशभरात आपला पक्ष वाढला आहे बाबासाहेबांचे नाव त्यांचा पक्ष सर्वत्र पसरला आहे म्हणून मला तिसऱ्यांदा मोदीजींनी संधी दिली आहे. आपल्या लोकांची शक्ती माझ्या पाठीशी राहिली म्हणून मला पुढे जाता आले. बाबासाहेब आणखीन 10, 15 वर्षे राहिले असते तर एक दिवस देशाचे पंतप्रधान झाले असते त्यांचे लवकर जाणे हे आपले दुर्भाग्य आहे. आरपीआय चा उमेदवार आपल्या बहुल भागात निवडून येत नाही म्हणून मित्र पक्ष जागा सोडत नाही. मुंबईत आपली ताकत आहे यापूर्वी 12 नगरसेवक निवडून आले त्यानंतर कधी आले नाही ह्याचा कार्यकर्त्यांनी विचार करण्याची गरज आहे. आज चा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांचे मोठे योगदान आहे. धर्मगुरू भन्ते राहुल बोधी यांनी आपल्या अमृतमहोत्सवी वाढदिवस कार्यक्रमात संबोधित करताना सांगितले कि संजय डोळसे यांनी आयोजित केलेला हा सोहळा अति महत्वाचा आहे आपले लोक नेते रामदास आठवले रात्र दिवस काम करत असतात. भारताच्या काना कोपऱ्यात फिरून बाबासाहेबांचे विचार लोकात नेतात. सत्ता महत्वाची आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. बाबासाहेबांनी सर्व समाज, पंथ, धर्मात बंधूभाव कसा निर्माण करावं हे आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.
No comments:
Post a Comment