उरणच्या यशश्री शिंदे प्रकरणात न्यायाचा एक टप्पा; ८ लाख मदत व शासकीय नोकरी जाहीर !!
यशश्री शिंदे प्रकरणात आरोपीला लवकर शिक्षा द्या; उरण आरपीआय आक्रमक
उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : उरण मध्ये यशश्री शिंदे हत्येनंतर केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासमवेत आरपीआय नेते प्रकाश मोरे, नरेंद्र गायकवाड व रायगड जिल्यातील सर्व कार्यकर्ते व स्थानिक आरपीआय नेते संजय गायकवाड यांनी पीडितेच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यावेळी कुटुंबाची परिस्थिती पाहून त्यांनी शासकीय नोकरी व आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती.
दिलेला शब्द पाळत पीडित कुटुंबाला सुमारे ८ लाखांची आर्थिक मदत तसेच शासकीय नोकरी लाभार्थी मानून अनुष्का शिंदे हिला देण्यात आली आहे. सदर नोकरीचे परिपत्रक रामदास आठवले यांच्या उपस्थितीत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २० मार्च २०२६ रोजी ‘चवदार तळे सत्याग्रह दिना’च्या औचित्याने विजय स्तंभ येथे नोकरीचे परिपत्रक प्रदान करण्यात आले.
पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नेते रामदास आठवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड व स्थानिक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने कुटुंबियांनी आभार व्यक्त केले.
या नोकरीसाठी जिल्हाधिकारी व जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी विशेष सहकार्य केले. तसेच प्रकरणातील आरोपीविरुद्ध फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी उरण आरपीआयने केली आहे
No comments:
Post a Comment