लालपरी (एसटी) विषयी महाराष्ट्राची आस्था वर्षानुवर्षे टिकलीय - साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील
उरण दि २८, (विठ्ठल ममताबादे) : उरण एसटी डेपोमध्ये एसटी विषयी आस्था आणि एसटी महामंडळाची व्यवस्था याविषयावर आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे साहित्यरत्न रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील आपल्या भाषणात म्हणाले की महाराष्ट्रातील मोठ्या शहरांपासून लहान खेड्यात लालपरी एसटीच्या भावनां आपुलकीच्या राहिल्या आहेत.त्यामुळे प्रत्येक माणसात एसटी विषयी आस्था असून खेडोपाड्यात एसटी थांबून नात्याप्रमाणे व्यवस्था मंडळाने केली आहे.
डेपोचे व्यवस्थापक गद्रे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत केले.यावेळी जेएनपीए फायनान्सचे डेप्युटी मॅनेजर महादेव घरत यांच्या सामाजिक सेवेबद्दल डेपो तर्फे सत्कार करण्यात आला.धनंजय पाटील यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.यावेळी विषयानुरूप शासनमान्य नशाबंदी विरोधात प्रचारक लवेंद्र मोकल यांनी. " माझी एसटी", आदर्श शिक्षक संजीव पाटील यांनी " घातक नशा तंबाखूची " ऍड.मच्छिंद्र घरत यांनी अभ्यासपूर्ण तंबाखूवर व्याख्यान दिले तर अनामिका राम या हिंदी भाषिक कवयित्रीची " लाल परी " ही कविता सादर करून एसटी कर्मचाऱ्यांना आनंद दिला.धनंजय पाटील यांनी पाहुण्यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment