ॲड.कैलास भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नामुळे मौजे बोकडवीरा येथील जमीनीला मिळाला प्रति चौ.मी.१७२५ /- रू.भरघोस भाव !
** भरघोस भाव मिळवून दिल्याबद्दल ॲड.कैलास भालचंद्र म्हात्रे यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार.
उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) :
सिडकोने २४/०९/१९८६ रोजी कवडीमोल भावाने उरण तालुक्यातील मौजे बोकडवीरा येथील जमीन संपादित केली होती.मात्र जमीन संपादन करतानाचा भाव, त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मान्य नव्हता.त्यातील एक शेतकरी भालचंद्र म्हात्रे यांनी कायदेशीर लढा लढण्याचा निर्णय घेत उरण मधील वकील ॲड. कैलास भालचंद्र म्हात्रे(फुंडे )यांच्याशी संपर्क साधला.व पुढील लढा लढण्याची तयारी दर्शविली.ॲड. कैलास भालचंद्र म्हात्रे (फुंडे) यांची मा.आलिबाग कोर्टात उपजिल्हाधिकारी,मेट्रो सेंटर उरण यांच्या विरोधात वाढीव भावासाठी केस कामी वकील म्हणून नेमणूक केली होती.परंतु दोनच महिन्यापूर्वी मौजे बोकडवीरा येथील काही शेतकऱ्यांना मा.अलिबाग कोर्टाने फक्त ७००/- रू.प्रति.चौ.मी.एवढाच अत्यल्प भाव मिळाला तसा निकाल लागला होता तशी बातमी वृत्तपत्रात, पेपरमधे शेतकऱ्यांनी वाचली त्यामुळे शेतकरी निराश झाले होते.परंतु ॲड.कैलास भालचंद्र म्हात्रे यांनी आपले कौशल्य पणाला लावून कायद्याच्या चौकटीत दोनच महिन्यात शेतकऱ्याची मौजे बोकडवीरा जमीनीला दिनांक २४/०३/२०२६ रोजी १७२५/- रू.प्रति.चौ.मी.असा भरघोस वाढीव भाव मिळवून दिला.तसा निकाल मा.अलिबाग कोर्टाने दिला. यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्व शेतकरी यांनी ॲड.कैलास भालचंद्र म्हात्रे ( फुंडे )यांचे जाहीर आभार व्यक्त केले.वकील कैलास भालचंद्र म्हात्रे यांनी अशाप्रकारच्या अनेक शेतकऱ्यांच्या केसेसमधे जास्तीत जास्त भाव मिळवून सिडकोकडून पैसे तत्काळ मिळवून शेतकऱ्यांना दिले आहेत म्हणूनच आमचा वकिलसाहेबांवर संपूर्ण विश्वास होता आणि आहे. ॲड. कैलास भालचंद्र म्हात्रे यांच्यामुळे आम्हाला न्याय मिळाला आहे असे मत प्रकल्पग्रस्त शेतकरी भालचंद्र लक्ष्मण म्हात्रे व ईतर शेतकरी यांनी व्यक्त केली आहे.ऍड कैलास म्हात्रे यांनी आजपर्यंत आपल्या वकिलीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. उरण मधील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
No comments:
Post a Comment