Monday, 30 March 2026

कॉंग्रेसला साथ देण्याची गरज : डॉ. रागिणी नायक

कॉंग्रेसला साथ देण्याची गरज :  डॉ. रागिणी नायक 

कर्जत, खोपोलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना महेंद्रशेठ घरत यांचे मार्गदर्शन

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी नेहरू गांधी यांच्या विचारांची गरज आहे. सध्या प्रतिकूल परिस्थितीत कॉंग्रेसला साथ देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी केले. कर्जत तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.   यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.  प्रदेश काँग्रेसच्या संगठन सृजन अभियानानिमित्ताने कर्जत तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे आयोजन नेरळ येथील साने हॉल येथे करण्यात आले होते.यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "कॉंग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे. 

पक्षाची विचारधारा घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. सध्या रायगड जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत आपण कार्यकर्त्यांच्या बळावर चांगले यश संपादन करीत आहोत. येत्या काळात पक्षाच्या वाढीसाठी आपणा सर्वांना हातात हात घालून काम करायचे आहे." यावेळी पक्षाच्या निरीक्षक राष्ट्रीय प्रवक्ता रागिणी नायक,पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस प्रदीप राव,मनीष गणोरे,पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत,महिला जिल्हा अध्यक्ष ॲड. श्रद्धा ठाकूर, सरचिटणीस मिलिंद पाडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते

No comments:

Post a Comment

सुधीर मुंबईकर आदर्श व्यक्तिमत्व - जे एम म्हात्रे.

सुधीर मुंबईकर आदर्श व्यक्तिमत्व - जे एम म्हात्रे. उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) :  शिक्षकाचे काम देश घडविण्याचे आहे, विद्यार्थ्या...