Tuesday 30 March 2021

मुरबाड स्टेट बँकेचे 45 लाखाचे एटीएम फोडून लंपास झालेले आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !! *पत्रकार परिषदेत ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली माहिती*

मुरबाड स्टेट बँकेचे 45 लाखाचे एटीएम फोडून लंपास झालेले आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !!
 
*पत्रकार परिषदेत ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली  माहिती*
 

मुरबाड, (मंगल डोंगरे) :
 
मुरबाड शहरातील कल्याण मुरबाड रोडला झुंजारराव कॉम्प्लेक्स जवळ भारतीय स्टेट बँकेचे शाखा असून दिनांक 24/ 3/ 2021 रोजी अज्ञात चोरट्यांनी एटीएम च्या रूम मध्ये घुसून एटीएम मशीन ला कोणत्याही प्रकारे नुकसान न करता 45 लाख रुपये लंपास केल्याची तक्रार बँकेचे मॅनेजर यांनी मुरबाड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल  करून  गुन्हा नोंद करताच पोलिस उपमहानिरीक्षक संजय मोहिते,  ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, ठाणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील  व मुरबाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे तसेच मुरबाड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांनी चारच दिवसात कोणतेही धागेदोरे हाती नसताना विशेष तपास पथके तयार करून गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून चार आरोपी व चोरीस गेलेल्या 45 लाख रुपयांपैकी 39 लाख,  69 हजार  700 रुपये  रोख रक्कम ताब्यात घेतली आहे 


यावेळी पत्रकार परिषद आयोजित केली असतात ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ती आरोपी यांनी दोन-तीन बँकांचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला तसेच आरोपी यांनी एसबीआय बँकेचे एटीएम फोडून 45 लाख रुपये लंपास केल्याची कबुली दिली असून एका आरोपीने त्याच्या कर्जाच्या पोटी 02 लाख रुपये बँकेत भरले असून दुसरा आरोपी याने 01लाख 10 हजार रुपये मोटरसायकल दुरुस्ती व बोलेरो कार दुरुस्ती साठी वापरून खर्च केले आहे अशी माहिती आरोपी यांनी दिली आहे याबाबत अधिक तपास सुरू असून उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
 
या तपासकामी मुरबाड पोलिस स्टेशनचे अनिल सोनवणे सहा पोलीस निरीक्षक ,पोलीस उपनिरीक्षक निकम, तोडकरी, निंबाळकर ,सहा फौजदार आर. तडवी. पोलीस हवालदार डोईफोडे ,चतुरे, आडबोल, नीचीते, पोलीस हवालदार मोरे ,शिंदे, खेडकर ,आर. के .भोसले, पोलीस शिपाई माळी, पारधी, चोरगे, कुळगाव पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक संदीप निगडे व त्यांचे पथक तसेच टोकावडे पोलिस स्टेशनचे सुहास खरमाटे व त्यांचे पथक यांनी विशेष मेहनत घेऊन आरोपींना मुद्देमालासह गजाआड केले त्यामुळे त्यांचे संपूर्ण तालुक्यामधून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...