Monday 29 March 2021

कांबा पावशेपाडा येथे दरोडा टाकणा-या टोळीची कल्याण तालुका पोलिसांकडून 'धुळवड' !

कांबा पावशेपाडा येथे दरोडा टाकणा-या टोळीची कल्याण तालुका पोलिसांकडून 'धुळवड' !


कल्याण, (संजय कांबळे) : गाव आपल्या बापाचा असल्यावानी अगदी बिनधास्त पणे गावातील लोकांना जिवघेण्या शस्त्राचा धाक दाखवून लुटालूट,मारहाण करणा-या चोरांच्या टोळीच्या कल्याण तालुका पोलीस व ठाणे ग्रामीण क्राईम ब्रँच यांनी मुसक्या आवळल्या असून इतर तिंघांची होळीच्या दिवशी बेड्या ठोकून यांची चांगलीच 'धुळवड' पोलिसांनी साजरी केली,त्यामुळे या दरोड्यातील आरोपींची संख्या ६ वर पोहचली आहे.
मागिल आठवड्यात कांबा पावशेपाडा येथे शसत्र दरोडा, लुटालूट, मारहाण करण्यात आली होती, हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला होता. हे चोर गावातून बिनधास्त फिरताना, प्रत्येकाचे घर डोकावताना, एका व्यक्तिला मारतानाचे विडिओ व्हायरल झाले होते.चोरांना पोलिसांचा धाक उरला आहे का? पोलिस करतात तरी काय? असे अनेक प्रश्न पत्रकार संजय कांबळे व इतरांनी उपस्थित केले होते,
 अखेर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, डिवाय एसपी डाँ बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण क्राईम ब्रँच व कल्याण तालुका पोलिसांनी विविध तपास पथके तयार करुन समातंर शोध सुरू केला, यामध्ये प्रथम अहमदनगर येथील पारनेर मधून किरन जांभडकर, अनिल पवार व अक्षय गायकवाड, यांना उचलले, यांना ३०मार्च पर्यत पोलीस कस्टडी सुनावल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून होळीच्या रात्री सागर केलास बर्डे, सागर बाळू माळी आणि राहुल श्रीरंग गायकवाड यांना पारनेर मधूनच ताब्यात घेतले, कल्याण तालुका पोलिसांनी यांना पोलिस ठाण्यात आणून यांचे सोबत चांगलीच 'धुळवड' साजरी केली,
  या घटनेचा तपास कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस इन्पेक्टर संतोष दराडे हे करित असून या प्रकरणात तालुका पोलीसांची तपासाची गती पाहता वपोनी राजू वंजारी व त्यांच्या टिमचे कौतूक व्हायलाच हवे!

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...