Friday 26 March 2021

कल्याण- डोंबिवलीत दर शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद ठेवण्याचे आदेश !

कल्याण- डोंबिवलीत दर शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद ठेवण्याचे आदेश !


कल्याण , दि.26 मार्च : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने हळूहळू निर्बंधही वाढवण्यास सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि कार्यालये बंद ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. उद्याच्या शनिवारपासून या आदेशांची अंमलबजावणी केली जाणार आहे. 
या आठवड्यात कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाच्या आकड्यांनी दररोज नवनविन रेकॉर्ड केले आहेत. कोरोना संख्येत अचानक झालेली ही वाढ पाहता केडीएमसी प्रशासनानेही त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर भाजी मार्केट 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यासह हॉटेल - बार आणि रेस्टॉरंटमध्ये केवळ पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच मॉल्सलाही नियमांचे पालन करून सुरू  ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच वाढत्या कोरोना आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यालाही मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचे आदेश आयक्त विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...